Lung Transplant  Saam Tv
महाराष्ट्र

Lungs Transplant: सोलापूरमधील 'सम्राट'ला गंभीर आजार, ST कर्मचाऱ्याचे कुटुंब आर्थिक संकटात, मदतीची केली विनंती!

Samrat Sathe Lungs Transplant : पुण्यातील कात्रज भागात राहणाऱ्या सम्राट नावाच्या मुलाचं फुफ्फुस प्रत्यारोप करायचे आहे. पुण्यातील नामांकित डी वाय पाटील हॉस्पिटल पिंपरी येथे त्याच्यावर उपचार चालू आहेत.

Bharat Jadhav

पुण्यामधील कात्रज या ठिकाणी राहणारे उत्तर सोलापूर बीबीदारफळ येथील रहिवासी श्री दत्तात्रेय साठे हे स्वारगेट आगार पुणे येथे एसटी परिवहन महामंडळ मध्ये कंडक्टर म्हणून कार्य करीत असून त्यांचा मुलगा सम्राट दत्तात्रय साठे हा कॉम्प्युटर इंजीनियरिंग चे शिक्षण घेत आहे. व तो हुशार देखील आहे.

छोट्याशा आजारातून सम्राटला इन्फेक्शन झालं होतं. त्याने वेळोवेळी उपचार घेतले परंतु इन्फेक्शनचा त्रास कमी झाला नाही. त्यामुळे सम्राटच्या आई-वडिलांनी पुण्यातील नामांकित डी वाय पाटील हॉस्पिटल पिंपरी येथील तज्ञ डॉक्टरांच्या साह्याने सर्व प्रकारच्या चाचण्या व उपचार चालू ठेवले आहेत. दरम्यान उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी केलेल्या निदानानुसार सम्राट याचे फुफुस मोठ्या प्रमाणात खराब झाले आहे. त्यामुळे डॉक्टरांनी तात्काळ सम्राटचे फुप्फुस प्रत्यारोपण करण्याचे सांगितले आहे.

सम्राटच्या फुफुस प्रत्यारोपण प्रक्रियेसाठी व उपचारासाठी हॉस्पिटल प्रशासनाने 55 लाख रुपये इतका खर्च येणार असल्याचे सांगितले आहे. परंतु सम्राटचे वडील हे एक परिवहन महामंडळातील सर्वसाधारण कर्मचारी आहेत. त्यांच्या घराची परिस्थिती ही अत्यंत नाजूक आहे. अशातच एवढा मोठा खर्च त्यांना कधीही शक्य होणार नाहीये. त्यामुळे सम्राटच्या आई-वडिलांनी आपल्या सर्वांना हात जोडून विनंती करत सम्राटसाठी मदतीचं आवाहन केलंय. सम्राटला आपला छोटा भाऊ समजून त्याच्या उपचारासाठी त्याच्या खाते क्रमांकवर किंवा त्याच्या उपचार चालू असलेल्या डी वाय पाटील हॉस्पिटलच्या खाते क्रमाकांवर आर्थिक सहकार्य करावे अशी विनंती सम्राटच्या पालकांनी केलीय.

आर्थिक सहकार्य करून आपल्या सम्राटला त्याच्या पुढील उज्वल आयुष्यासाठी मदत करावी अशी भावनिक विनंती केलेली आहे. सामाजिक क्षेत्रात व वैद्यकीय क्षेत्रात यशस्वी कार्य असलेले सोलापूरचे सामाजिक कार्यकर्ते विजयानंद पांडुरंग हक्के राहणार पेहे तालुका पंढरपूर यांनीही मदतीचे आवाहन केले आहे. त्यांनी महाराष्ट्रातील सर्व पक्षांचे प्रमुख तसेच आमदार ,प्रशासनातील अधिकारी, शेतकरी बांधव, आणि उद्योग व व्यापार क्षेत्रातील मान्यवरांकडे आर्थिक मदत मागितलीय.

सम्राटला मदतीसाठी खालील क्रमांकावर संपर्क करून सहकार्य करावे.

1) श्री विजयानंद पांडुरंग हक्के -9552094440 सामाजिक कार्यकर्ते सोलापूर.

* 2) श्री दत्तात्रेय साहेबराव साठे-8767746059 (सम्राट चे वडील)

* सम्राट च्या मदतीसाठी खालील खाते क्रमांकावर सहकार्य करावे.

* १) श्री दत्तात्रेय साहेबराव साठे

* बँकेचे नाव-स्टेट बँक ऑफ इंडिया

* खाते क्रमांक-40829507602

* आय एफ एस सी कोड-SBIN0006117.

* 2) डॉ. डी वाय पाटील हॉस्पिटल व रिसर्च सेंटर

* शाखा-संत तुकाराम नगर ,पिंपरी, पुणे.

* खाते क्रमांक-111710011000540 (सेविंग)

* आय एफ एस सी कोड-UBIN0811173.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! 'या' तारखेपासून लागू होणार आठवा वेतन आयोग; समोर आली मोठी अपडेट

Mansi Naik : मानसी नाईकबद्दल या ५ गोष्टी तुम्हाला माहितीयेत का?

Maharashtra Live News Update: महात्मा फुले रुग्णालयच्या पुनर्निर्माणवरून श्रेयवाद रंगला

Mobile Recharge: कमी बजेट? तरीही मिळणार 5G इंटरनेट, Vi चा 'हा' प्लॅन तुमच्यासाठी आहे परफेक्ट

Actress Oops Moment: 'द फॅमिली मॅन ३' फेम अभिनेत्रीचा इव्हेंटमध्ये तोल गेला; पायऱ्यांवरून उतरताना पडली अन्..., VIDEO व्हायरल

SCROLL FOR NEXT