maratha reservation 
महाराष्ट्र

राजकीय पक्षांना वेगळा आणि मराठा समाजाला वेगळा न्याय, असे का ?

Siddharth Latkar

सातारा : राजकीय पक्षांना वेगळा न्याय आणि मराठा समाजाला वेगळा न्याय, असे का ? असा संतप्त सवाल खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी उपस्थित केला आहे. नांदेड येथील मराठा आरक्षणासाठीच्या maratha reservation मूक आंदाेलनानंतर आयाेजकांपैकी सुमारे २१ जणांवर पाेलिसांनी काेविड मार्गदर्शकतत्वांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. त्यावरुन खासदार संभाजीराजे छत्रपती Sambhaji Chhatrapati यांनी समाजमाध्यमातून तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

मराठा आरक्षण मिळावे यासाठी मराठा समाजाच्यावतीने नांदेड येथे संभाजीराजे छत्रपती यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी मूक आंदाेलन झाले. त्यावेळी हजाराेंच्या संख्येने मराठा बांधव उपस्थित हाेते. आपल्या भाषणातून प्रत्यक्ष अप्रत्यक्ष खासदार संभाजीराजेंनी मराठा समाजाचे नेते अशाेक चव्हाण यांच्या भुमिकेवर टीका केली. तसेच सरकारने तातडीने पावले उचलावीत अशी अपेक्षा व्यक्त केली.

दरम्यान या आंदाेलनानंतर पाेलिसांनी काेविड १९ च्या नियमांचा भंग म्हणून सुमारे २१ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. सामान्य गरीब मराठा बांधवांवार गुन्हा दाखल झाल्याची भावना खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी व्यक्त करुन सरकारला काही प्रश्न केले आहेत. त्यांचा राग त्यांनी समाज माध्यमातून व्यक्त केला आहे.

खासदार संभाजीराजे छत्रपती म्हणालेत गुन्हा दाखल करायचाच असेल तर माझ्यावर करा!समाजाच्या गरीब मराठा बांधवांच्यावर का? समाजाच्या प्रश्नांसाठी नांदेड येथे एकत्र आलेल्या मराठा बांधवांवर प्रशासनाने काेविडचे कारण दाखवत गुन्हे दाखल केले आहेत. राजकीय पक्षांना वेगळा न्याय आणि मराठा समाजाला वेगळा न्याय, असे का? असा संतप्त प्रश्न संभाजीराजेंनी उपस्थित केला आहे.

जिल्हाधिकारी नांदेड यांनी १४४ कलम अन्वये संचारबंदी लागू असताना तसेच आंदाेलनाची कुठलीही पुर्वपरवानगी न घेता सदर आंदाेलन करुन सामाजिक अंतराचे पालन न करता काेराेना विषाणुचा प्रादुर्भाव वाढेल अशी घातक कृती करुन आंदाेलन केले. जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केले असे पाेलिस अधिका-याने दिलेल्या फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : पुण्यात औधमधे अपघात, अपघातात वयोवृद्ध महिला जखमी

ठाकरे गटाच्या खासदाराला 100 कोटींसह केंद्रीय मंत्रिपदाची ऑफर, माजी आमदाराचा गौप्यस्फोट, राजकीय वर्तुळात खळबळ

Tilachi Chutney Recipe : हिवाळ्यात खायलाच पाहिजे, तिळाची पौष्टिक आणि चवदार चटणी!

प्रिन्सिपलच्या छळाला कंटाळली; विद्यार्थिनीनं शाळेतच आयुष्य संपवलं, सुसाईड नोटमध्ये लिहिलं 'बॅड टच'

Gauri Garje Death Case: माझ्या मुलीला मारलंय; आत्महत्या नाही तर हत्याच, गौरीच्या कुटुंबीयांचा गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT