yuvraj sambhajiraje chhatrapati saam tv
महाराष्ट्र

Maratha Reservation: 'अशा बैठका पोकळ...' मराठा आरक्षणासंदर्भातील सर्वपक्षीय बैठकीवर संभाजीराजे छत्रपतींचा बहिष्कार

Maratha Reservation: मराठा आरक्षणासंदर्भातील महत्वाच्या सर्वपक्षीय बैठकीवर संभाजीराजे छत्रपती यांनी बहिष्कार टाकल्याचे पाहायला मिळाले.

Gangappa Pujari

Chhatrapati Sambhajiraje News:

राज्यात मराठा आरक्षणाचा लढा दिवसेंदिस तीव्र होताना दिसत आहे. मराठा आरक्षणाबाबत चर्चा करण्यासाठी सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे राज्य सरकारकडून सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावण्यात आली होती. मात्र या बैठकीवर संभाजीराजे छत्रपती यांनी बहिष्कार टाकल्याचे पाहायला मिळाले. या संदर्भात स्वतः संभाजीराजे छत्रपतींनी आपली भूमिका स्पष्ट करताना या बैठकीवर टीकास्त्र सोडले.

काय म्हणाले छत्रपती संभाजीराजे?

मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत आहे, राज्यात आत्महत्या होत आहेत, मराठा आंदोलन तीव्र होत आहे. तरीदेखील सरकार केवळ बैठकांचा खेळ करीत आहे. अशा बैठकांमध्ये वेळ न दवडता सरकारने ठोस पावले उचलावीत. केंद्र सरकारनेही केवळ बघ्याची भूमिका न घेता तात्काळ या विषयामध्ये लक्ष घालून मराठा समाजाला आरक्षण द्यावे, हीच आमची अंतिम मागणी आहे.... असे संभाजीराजे छत्रपती म्हणाले.

"गेल्या पंधरा वर्षांपासून मराठा आरक्षण चळवळीत सक्रिय असताना कोणत्याही सरकारने समाजासाठी बोलाविलेल्या एकाही शासकीय बैठकीस मी अनुपस्थित राहिलो नाही. दोन वेळेस आरक्षणही मिळाले होते मात्र मागील सरकारच्या घोडचुकांमुळे दुर्दैवाने मराठा आरक्षण रद्द झाल्याचेही छत्रपती संभाजी राजेंनी आपल्या एक्स पोस्टमध्ये (Twitter) म्हणले आहे.

तसेच सध्या आरक्षणाच्या नावाने केवळ पोकळ बैठकांचे सत्र चालू असल्याचे दिसून येत आहे. यातून कोणताही मार्ग निघत नाही अथवा आरक्षण कसे देणार, किती कालमर्यादेत देणार याचा मार्गही सांगितला जात नाही. सर्वपक्षीय मंडळी देखील मराठा आरक्षणाला पाठिंबा देतात, बैठकांना येतात मात्र मार्ग सांगत नाहीत... अशी टीकाही त्यांनी केली आहे.

मराठा समाजाला आरक्षण देणे यापेक्षा प्रत्येकाला आपापली व्होटबँक सांभाळणे अधिक महत्त्वाचे वाटत आहे. त्यामुळे आजच्या बैठकीस मी अनुपस्थित राहण्याचा निर्णय घेतला. समाज आता अशा बैठकांना भूलणार नाही, आरक्षण मिळेपर्यंत लढा सुरूच राहील... अशा शब्दात संभाजीराजे छत्रपती या बैठकीवर टीका केली असून अनुपस्थित राहण्याचे कारणही स्पष्ट केले आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नवापूर उड्डाणपुलावर भीषण अपघात दोघांचा मृत्यू

jalna Crime : लाडक्या बहिणीची बदनामी केली, भावाला राग अनावर, १९ वर्षाच्या तरूणाची केली हत्या

HSRP Update : महत्त्वाची बातमी! HSRP नंबर प्लेट बसवण्यासाठी 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ; नियम मोडल्यास दंड

Ladki Bahin Yojana : ₹४५०० की ३००० रूपये, लाडक्या बहि‍णींच्या खात्यावर पैसे जमा, लगेच करा चेक

Petrol-Diesel Prices : गॅस सिलिंडरनंतर आता पेट्रोल-डिझेल महागले; तुमच्या शहरातील दर काय?

SCROLL FOR NEXT