Harsul Lake Saam tv
महाराष्ट्र

Sambhajinagar Water Crisis : हर्सूल तलावाने गाठला तळ; केवळ अडीच टक्के साठा शिल्लक

Sambhajinagar News : ऐन उन्हाळ्यातच शहरात तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली असल्याने शहरवासीयांची तहान भागविण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून विविध उपाय योजना राबविण्यात येत आहेत

Rajesh Sonwane

रामू ढाकणे 

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमधील जुन्या शहरातल्या अनेक वॉर्डांना पाणी पुरवठा करणाऱ्या हर्सूल तलावाने आता तळ गाठला आहे. त्यामुळे सध्या हर्सूल तलावात केवळ अडीच फूट इतकाच पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. यामुळे आता पाणी टंचाईचा सामना या भागात करावा लागणार आहे.  

ऐन उन्हाळ्यातच शहरात तीव्र पाणी टंचाई (Water Scarcity) निर्माण झाली असल्याने शहरवासीयांची तहान भागविण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून विविध उपाय योजना राबविण्यात येत आहेत. मात्र धरणात आणि तलावात अत्यंत कमी पाणीसाठा शिल्लक असल्यामुळे नागरिकांवर आता पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ येत आहे. तर दुसरीकडे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जायकवाडी धरणातही (Jayakwadi Dam) उपयुक्त पाणीसाठा हा केवळ ६.१२ टक्क्यावर आला असल्याने ग्रामीण भागात देखील याचे परिणाम पाहायला मिळत आहे.

संभाजीनगर (Sambhajinagar) शहरातील जुन्या भागात पाणी पुरवठा होत असलेल्या हर्सूल तलावाच्या पाण्यावर तहान भागविल्या जाणाऱ्या शहरातील १४ वार्डावर पाणी संकट निर्माण झाले आहे. शहागंज येथील जलकुंभातून १४ वार्डांना पाणी पुरवठा केला जात असल्याने पाण्यासाठी कसरत करण्याची वेळ आता मनपावर आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT