Sambhajinagar News Saam tv
महाराष्ट्र

Sambhajinagar : वारकरी संप्रदायातील चार मुले गोदावरीत बुडाले; दोघांचा मृत्यू, अंघोळीसाठी गेले असताना घडली घटना

Sambhajinagar News : पैठण येथे वारकरी संप्रदायाचे शिक्षण देणारी संस्था आहे. याठिकाणी मुलांना लहानपणापासून शिक्षणासाठी अनेक पालक टाकत असतात. काही बालक आज सकाळच्या सुमारास गोदावरी नदीत अंघोळीसाठी गेले

डॉ. माधव सावरगावे

छत्रपती संभाजीनगर : संभाजीनगर जिल्ह्यातील पैठणमध्ये वारकरी संप्रदायाचे शिक्षण घेण्यासाठी मुले आहेत. दरम्यान गोदावरी नदीत स्नान करण्यासाठी चार बालके गेले असता नदी पात्रातील खड्यात ते बुडाले. यात दोघांना वाचविण्यात यश मिळाले असून दोन मुलांचा बुडून मृत्यू झाला आहे. त्यांचा शोध घेणे सुरु आहे. दरम्यान घटनेमुळे खळबळ उडाली आहे. 

संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण येथे वारकरी संप्रदायाचे शिक्षण देणारी संस्था आहे. याठिकाणी मुलांना लहानपणापासून शिक्षणासाठी अनेक पालक टाकत असतात. वारकरी संप्रदायिक शिक्षण देण्यासोबत दहावी- बारावी पर्यंतचे शिक्षणाचे धडे देखील दिले जात असतात. त्यानुसार येथे अनेक बालक दाखल आहेत. दरम्यान काही बालक आज सकाळच्या सुमारास जवळच असलेल्या गोदावरी नदीत अंघोळीसाठी गेले होते. 

गोदावरीत चौघे गेले स्नानाला 

पैठण शहरातील रंगारहाटीत विष्णू महाराज गायकवाड यांच्या वारकरी संस्थेत इतर मुलांसोबत चैतन्य बदर हा इयत्ता आठवीत, तर भोलेनाथ पवळे हा इयत्ता पाचवीत शिक्षण घेत होता. हे दोघे जण आपले मित्र अर्जुन राजुरकर आणि करण तुपे यांच्यासोबत गोदावरी नदीत स्नान करण्यासाठी गेले. हे चौघे पाण्यात उतरले. मात्र गोदावरी नदी पात्रातील पाण्याचा अंदाज त्यांना आला नाही. 

दोघांना वाचविण्यात यश 

ज्याठिकाणी हे चारही मुले अंघोळीसाठी उतरले त्याठिकाणी खड्डा असल्याचे त्यांच्या लक्षात आले नाही. यामुळे चौघेही पाण्यात गटांगळ्या खाऊ लागले. आजूबाजूच्या वारकऱ्यांचा हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी लागलीच धाव घेतल्याने यातील दोघांना वाचविण्यात यश आले. मात्र, चैतन्य अंकुश बदर आणि भोलेनाथ कैलास पवळे या दोन्ही बाल वारकऱ्यांचा बुडून मृत्यू झाला आहे. त्यांचा मृतदेह शोधण्याचा काम सुरु आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Saam Impact: भ्रष्ट अधिकाऱ्यांना आता दे धक्का! 314 अधिकारी मुख्यमंत्र्यांच्या रडारवर

Buldhana News: रस्त्यावरच महिलेची प्रसूती, मदतीसाठी कुणीच येईना; रुग्णालयाने नकार दिला, शेवटी...

रात्री झोपताना कंबर आणि पायाचा घोटा दुखतायत? तुमच्या दैनंदिन वापरातील 'ही' वस्तू ठरू शकते कारण

Maharashtra News Live Update: चितेगाव टोलनाक्याजवळ दोन कारची जोरदार धडक; जीवितहानी टळली

Crime: रायगड हादरले! १६ वर्षीय मुलीवर बलात्कार, मित्रानेच केलं भयंकर कृत्य

SCROLL FOR NEXT