Sambhajinagar News Saam tv
महाराष्ट्र

Sambhajinagar News: शेतीसाठी सावत्र मुलाने आईला दाखवले मृत; स्वतःचे मृत्युपत्र घेऊन महिलाच आली समोर

शेतीसाठी सावत्र मुलाने आईला दाखवले मृत; स्वतःचे मृत्युपत्र घेऊन महिलाच आली समोर

साम टिव्ही ब्युरो

नवनीत तापडीया

छ्त्रपती संभाजीनगर : शेत जमिनीसाठी सावत्र मुलाने जिवंत असलेल्या आईला ग्रामपंचायतीत कागदोपत्री मृत दाखविण्याचा धक्कादायक प्रकार वैजापूर तालुक्यातील (Sambhajinagar News) आघूर येथे उघडकीस आला आहे. या मृत्यू प्रमाणपत्राच्या (Death Certificate) आधारे ३ एकर शेतजमीन हडपण्याचा डाव महिलेने प्रकट होत उधळून लावला आहे. स्वतःच्या मृत्यू प्रमाणपत्र घेवूनच ती महिला पंचायत समितीत दाखल झाल्याने एकच गोंधळ उडाला होता. (Live Marathi News)

आघूर (संभाजीनगर) येथील मंगलबाई उत्तमसिंग राजपूत या आपल्या मुलीच्या घरी रांजणगाव येथे राहतात. आघूर शिवारात त्यांची शेतजमीन आहे. ही शेतजमीन हडपण्याच्या उद्देशाने त्यांचा दीर शंकरसिंग रतनसिंग राजपूत त्यांची दोन मुले व महिलेचा सावत्र मुलगा पंकज राजपूत यांनी या सर्वांनी मिळून खोटी माहिती देवून ग्रामसेवकाच्या स्वाक्षरीने प्रमाणपत्र तयार केले. हे प्रमाणपत्र तलाठी कार्यालयात देवून आपली जमीन नावावर करण्याचा त्यांचा डाव असल्याचे महिलेने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

पंचायत समितीत उडाला गोंधळ

स्वतःचे मृत्यू प्रमाणपत्र घेवून मंगलबाई या पंचायत समितीत दाखल झाल्या. त्यांनी या प्रकारची सविस्तर माहिती प्रभारी गटविकास अधिकारी एच.आर. बोयनर यांना देत संबंधितांवर कारवाईची मागणी केली. दरम्यान ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकाने कोणतीही खातरजमा न करता हे प्रमाणपत्र कसे दिले असा प्रश्न उपस्थित होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Influencers Harassed in Mumbai: बिहारींनी लाज काढली! विदेशी क्रिएटरसोबत भररस्त्यात अश्लील कृत्यू, मुंबई पोलिसांनी शिकवला धडा

IND vs ENG Semi final: सेमीफायनलआधी टीम इंडियाला इशारा, इंगलंडचा खेळाडू म्हणतो वानखेडेवरील फॅन्सला शांत करू

Petrol Diesel Price : युद्ध भडकलंय तरी पेट्रोल,डिझेल भडकणार नाही? कसे?

Clove Benefits: उन्हाळ्यात लवंग का खातात?

Genelia Deshmukh: 'पिंक स्वॅग...'; जिनिलीया देशमुखचा ग्लॅमरस पिंक बार्बी लूक व्हायरल

SCROLL FOR NEXT