Sambhajinagar Water Scarcity Saam tv
महाराष्ट्र

Sambhajinagar Water Scarcity : भर पावसाळ्यात संभाजीनगर जिल्ह्यात टँकरने पाणीपुरवठा; गंगापूर तालुक्यात सर्वाधिक टँकर

Sambhajinagar News : यंदाच्या उन्हाळ्यात राज्यातील जवळपास सर्वच भागात दुष्काळी परिस्थिती उद्भवलेली होती. यामुळे भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत होता.

Rajesh Sonwane

रामू ढाकणे 

छत्रपती संभाजीनगर : पावसाळा सुरू होऊन दीड महिन्यांचा कालावधी उलटला तरी देखील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अनेक गावांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. सद्यस्थितीला छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील २७९ गावांची तहान ४०७ टँकरने भागविली जात आहे. यामुळे आजही जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यासाठी दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.  

यंदाच्या उन्हाळ्यात राज्यातील जवळपास सर्वच भागात दुष्काळी परिस्थिती उद्भवलेली होती. यामुळे भीषण पाणी टंचाईचा (Water Crisis) सामना करावा लागत होता. पाण्याची समस्या दूर करण्यासाठी टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात होता. दरम्यान जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पावसाळा सुरवात झाल्यानंतर हळूहळू पाणी टँकरची संख्या कमी झाली. मात्र संभाजीनगर (Sambhajinagar) जिल्ह्यासह मराठवाड्यातील अनेक भागात आजही पाण्याची समस्या कायम आहे. यामुळे पावसाळ्यात देखील टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे.  

दमदार पावसाची प्रतीक्षा 

संभाजीनगर जिल्ह्यात आजही चारशेहून अधिक टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. यात गंगापुर तालुक्यात सर्वाधिक ११० टँकर आहेत. संभाजीनगर जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्याची तहान भागविणाऱ्या (Jayakwadi Dam) जायकवाडी धरणाचा साठा ही ४.३ टक्क्यावर आहे. तर जिल्ह्यातील इतर लघु मध्यम आणि मोठ्या प्रकल्पातील पाणी पातळीची स्थिती जैसे थेच असल्याने नागरिकांना आता दमदार पावसाची अपेक्षा आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मुंबईत'हिट अँड रन'चा थरार! मध्यरात्री टँकरने डिलिव्हरी बॉयला चिरडले

Palghar Tourism : निसर्गाचा मनसोक्त आनंद घ्यायचाय; तर पावसाळ्यात पालघरमधील या ठिकांणाना नक्की भेट द्या

Maharashtra News Live Update: पुण्यातील कोंढवा परिसरात मोठी वाहतूक कोंडी

Mumbai Pune Missing Link: मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर 2 महिन्यातच खड्डे; व्हिडीओ समोर आल्याने एकच खळबळ

Gold Rate Today: सोन्याची किंमत घसरली! प्रति तोळा सोनं ₹1,46,730 वर; वाचा २४k, २२k, १८k सोन्याचा आजचा भाव

SCROLL FOR NEXT