Water Shortage Saam tv
महाराष्ट्र

Water Shortage : मराठवाड्यात तीव्र टंचाई; टँकरची संख्या वाढून पोहचली १४०० च्या वर

Sambhajinagar News : यंदा कमी पाऊस झाल्यामुळे सर्वत्र पाणी टंचाईची भीषणता जाणवत आहे. यामुळे अगदी मार्च महिन्यापासूनच पाणी टंचाई दूर करण्यासाठी अनेक गावांमध्ये टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे

डॉ. माधव सावरगावे

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात दुष्काळाच्या झळा अधिक तीव्र होत असून दिवसेंदिवस टँकरची संख्या वाढू लागली आहे. (Sambhajinagar) मराठवाड्यात एप्रिल महिन्यात सुरू असलेल्या टँकरची संख्या वाढत जाऊन आता मे महिन्याच्या सुरुवातीला ९६१ गावे आणि ३४५ वाड्यांना १ हजार ४२४ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. 

यंदा कमी पाऊस (Rain) झाल्यामुळे सर्वत्र पाणी टंचाईची भीषणता जाणवत आहे. यामुळे अगदी मार्च महिन्यापासूनच पाणी टंचाई दूर करण्यासाठी अनेक गावांमध्ये टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. यात मराठवाड्यात (Marathwada) पाण्याची टंचाई अधिक असून एप्रिल महिन्यानंतर टँकरच्या संख्येत देखील वाढ झाल्याचे पाहण्यास मिळत आहे. १२ लाख ग्रामस्थांना टँकरच्या पाण्याविना पर्याय नसून टँकर वेळेत गेले नाहीत, तर त्यांना पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ येत आहे. 

एकीकडे निवडणुकीची धामधूम आणि दुसरीकडे मराठवाडा दुष्काळी स्थिती असे चित्र सध्या आहे. जानेवारी महिन्यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १०९ तर जालना जिल्ह्यात ७६ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत होता. फेब्रुवारीमध्ये ही संख्या ३१९ वर पोहोचली. मार्च महिन्यात टँकरची संख्या ४३५ वर पोहोचली. एप्रिल महिन्यात मराठवाड्यात टँकरची संख्या १४२४ वर पोहोचली आहे. आता त्यात आणखी वाढ होत आहे.

मराठवाड्यातील टँकरची स्थिती 
छत्रपती संभाजीनगर ५६९, जालना ४१८, परभणी ५, नांदेड १५, बीड ३०२, लातूर १३, धाराशिव १०२

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: आषाढी एकादशीनिमित्त श्रीक्षेत्र आळंदीमध्ये भक्तिरसाचा अपार उत्सव

Breakfast Recipe: वाटीभर रव्यापासून बनवा 'हा' हेल्दी नाश्ता, टिफिनसाठी सुद्धा ठरेल बेस्ट

Cancer Prevention: 'हे' विशेष प्रथिने कर्करोग वाढण्यापूर्वीच थांबवतात, जाणून घ्या कार्य कसे करते

Ashadhi Ekadashi 2025: आषाढी एकादशीला उपवासाचे नियम आणि पूजा विधी जाणून घ्या

Metro In Dino Collection : 'मेट्रो इन दिनों'ची उंच भरारी, वीकेंडला किती कोटींची कमाई?

SCROLL FOR NEXT