Sambhajinagar News Saam tv
महाराष्ट्र

Sambhajinagar News : विहिरीत पडून दोन तरुण बुडाले, तलावात पडल्याने महिलेचाही मृत्यू; सिल्लोड, खुलताबाद तालुक्यात एकाच दिवसात घडल्या घटना

Sambhajinagar News : संभाजीनगर जिल्ह्यात घडलेल्या या तीन घटनांमध्ये निवृत्ती आहेर, गौरव जाधव व सगुणाबाई महीपत पवार असे मृतांची नावे आहेत

Rajesh Sonwane


रामू ढाकणे 

छत्रपती संभाजीनगर : संभाजीनगरच्या सिल्लोड व खुलताबाद तालुक्यात एकाच दिवशी घडलेल्या तीन वेगवेगळ्या घटनांमध्ये तिघांचा बुडून मृत्यू झाला आहे. यात दोन तरुणांचा व एका महिलेचा समावेश आहे. मनपा आणि अग्निशामक दलाच्या पथकाने रेस्क्यू करत या तिघांचेही मृतदेह बाहेर काढले.

संभाजीनगर (Sambhajinagar News) जिल्ह्यात घडलेल्या या तीन घटनांमध्ये निवृत्ती आहेर, गौरव जाधव व सगुणाबाई महीपत पवार असे मृतांची नावे आहेत. पहिल्या घटनेत दसऱ्यानिमित्त गावाकडे आलेल्या निवृत्ती आहेर हा सिल्लोड शिवारात रविवारी सकाळी प्रांतविधीसाठी गेले होता. मात्र तो घरी न परतल्याने कुटुंबीयांनी त्याचा शोध घेतला असताना शेतातील विहिरीजवळ त्याची चप्पल दिसून आली. यानंतर शोध घेतला असता विहिरीत त्याचा मृतदेह आढळून आला. तर सिरसाळा तांडा शिवारात असलेल्या तलावात रविवारी कपडे धुण्यासाठी गेलेल्या सगुणाबाई (वय ४२) या गेल्या होत्या. कपडे धुवत असताना पाय घसरून तलावात बुडून मृत्यू झाला.

तिसरी घटना खुलताबाद तालुक्यातील शेखपुरवाडी शिवारात घडली. दसरा असल्याने गावी आलेला गौरव मनोज जाधव (वय १७, रा. बाजारसावंगी) हा त्याच्या मित्रांसोबत विहिरीवर पोहण्यासाठी गेला होता. गौरवला पोहता येत नसताना देखील त्याने विहिरीत उडी घेतली. यात तो विहिरीत बुडाला. सोबतच्या मित्रांनी गावात हि माहिती सांगितल्यानंतर कुटुंबीय व गावकर्यांनी धाव घेत मृत देह बाहेर काढला. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: ५ दिवसांत कॅन्सर गायब करणारा डोस? एकाच डोसने गाठी पूर्णपणे नष्ट?

Wednesday Horoscope : चुका टाळाव्यात, सरकारी कामे रखडतील; ५ राशींच्या लोकांचे वाढू शकते संकट

Maharashtra Politics: ठाकरे-पवारांच्या मदतीला फडणवीस, ऑपरेशन टायगरला फडणवीसांचा चाप?

FORM 16: १ एप्रिलपासून कर्मचाऱ्यांसाठी मोठा बदल, फॉर्म 16 ऐवजी आता भरा फॉर्म 130

Ashok Kharat Case : नाशिकच्या भोंदूच्या दरबारी राजकीय नेत्यांची हजेरी; अशोक खरातचे 40 भक्त कोण?

SCROLL FOR NEXT