Sambhajinagar News Saam tv
महाराष्ट्र

Sambhajinagar News : गावठी कट्ट्यासह एकजण ताब्यात; संभाजीनगर पोलिसांची कारवाई

sambhajinagar News : संभाजीनगरच्या वाळूज एमआयडीसी पोलिस स्टेशन हद्दीत एकजण गावठी कट्टा बाळगून असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

डॉ. माधव सावरगावे

छत्रपती संभाजीनगर : दिवाळी सण उत्सवामध्ये गंभीर स्वरूपाचा गुन्हा करण्यासाठी वापरण्यात येणारा गावठी कट्टा व ५ जिवंत काडतूसासह एका २४ वर्षीय आरोपीस संभाजीनगरच्या वाळूज एमआयडीसी पोलिसांनी पकडून ताब्यात घेतले आहे. 

संभाजीनगरच्या (Sambhajinagar) वाळूज एमआयडीसी पोलिस स्टेशन हद्दीत एकजण गावठी कट्टा बाळगून असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीवरून एमआयडीसी वाळूज येथे पोलिसांनी (Police) सापळा रचुन संशयित आरोपी सुरज पाईकराव याला ताब्यात घेतले. तसेच त्याच्या जवळील ३० हजार रुपये किमतीचा देशी बनावटीचा व लोखंडी धातुचा (मॅगझीन नसलेला त्यास लाकडी मुठ असलेला) गावठी कट्टा व ५०० रुपये किमतीचे पाच जिवंत काडतुस तसेच 5 हजार रुपये किमतीचा मोबाईल जप्त केला आहे. 

पोलिसात गुन्हा दाखल 

वाळूज पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या सुरज पाईकराव यांच्याकडून सुमारे ३५ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच याप्रकरणी पोलीस अंमलदार विशाल साहेबराव पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पाटील पिता-पुत्र खून खटल्यात कोर्टाचा निकाल, माजी नगराध्यक्ष पवारसह 11 जणांना दुहेरी जन्मठेपेची शिक्षा; नेमकं प्रकरण काय?

Maharashtra Live News Update: जागर प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांकडून धुळे - सोलापूर महामार्गावर टायर जाळून आंदोलन

LPG Gas Cylinder Crisis: शहरात आणि ग्रामीण भागात किती दिवसांनी मिळेल गॅस सिलिंडर? सरकारनं दिली नवी अपडेट

Crime: किरकोळ वादातून भयंकर हत्याकांड, तलवारीने सपासप वार करत तरुणाने बायको अन् मुलाला संपवलं

महानगर गॅसच्या कार्यालयात गोंधळ; वाढीव बिलांवरून शरद पवार गट आक्रमक, अधिकाऱ्यांना दिला काळं फासण्याचा इशारा

SCROLL FOR NEXT