Sambhajinagar Crime Saam tv
महाराष्ट्र

Sambhajinagar Crime : संतापजनक..मूल होत नसल्याने विवाहितेच्या अंगावर मारले खिळे; दोघांवर गुन्हा दाखल

Sambhajinagar News : गंगापूर तालुक्यातील जामगाव येथे शारीरिक छळ करताना थेट विवाहितेच्या अंगावर खिळे मारून अमानुष छळ केला जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे

Rajesh Sonwane

रामनाथ ढाकणे

छत्रपती संभाजीनगर : मूलबाळ होत नसल्यामुळे महिलेचा अमानुष छळ करण्यात आला आहे. इतकेच नाही तर विवाहितेच्या अंगावर खिळे मारल्याचा धक्कादायक प्रकार (Sambhajinagar) छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यात समोर आला आहे. या प्रकरणी दोन जणांवर गुन्हा (Police) दाखल करण्यात आला आहे. (Breaking Marathi News)

लग्नानंतर (Marriage) मुलबाळ होत नसल्याने विवाहितेचा मानसिक व शारीरिक छळ केला जात असल्याचे अनेक प्रकार ऐकण्यास मिळतात. मात्र संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील जामगाव येथे शारीरिक छळ करताना थेट विवाहितेच्या अंगावर खिळे मारून अमानुष छळ केला जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आत्मा असल्याचे सांगत मारहाण 

तुझ्या अंगात तृतीयापंथीयाचा आत्मा आहे. त्यामुळे मुलबाळ होत नसून, तो आत्मा बाहेर काढण्याचा बहाणा करून एका विवाहितेला काठीने मारहाण करीत अंगावर खिळे मारून तिचा अमानुष छळ केला गेला. गंगापूर तालुक्यातील जामगाव येथे हा प्रकार घडला असून, याप्रकरणी आबिदा मुक्तार शेख आणि हकीम मुक्तार शेख यांच्यावर गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या प्रकाराने संताप व्यक्त केला जात आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नागपूरमध्ये ट्रॅक्टर पुलावरून नदीत कोसळला, एकाचा जागीच मृत्यू

Online Rent Agreement : घरमालक आणि भाडेकरूंनी ऑनलाइन भाडेकरार कसा करावा? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

Farmer Loan Waiver Scheme: मयत शेतकऱ्यांच्या वारसांनाही कर्जमुक्तीचा लाभ मिळणार, सरकारचा मोठा निर्णय

पांढरे कपडे पुन्हा नव्यासारखे चमकवा! पिवळे डाग घालवण्यासाठी ‘या’ ५ स्मार्ट ट्रिक्स वापरा

Wardha: ग्रामसभेत दोन गटामध्ये तुंबळ हाणामारी, गावकऱ्यांनी एकमेकांना धूधू धुतलं; व्हिडीओ व्हायरल

SCROLL FOR NEXT