Sambhajinagar Crime Saam tv
महाराष्ट्र

Sambhajinagar Crime : महापालिका रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना चोरांची बेदम मारहाण; हॉस्पिटलमध्ये येण्यास मज्जाव केल्याचा राग

Sambhajinagar News : छत्रपती संभाजीनगर शहरातील चिकलठाणा परिसरात असणाऱ्या महापालिकेच्या मेल्ट्रॉन हॉस्पिटलमध्ये काही नशा केलेले चोर येण्याचा प्रयत्न करत होते

Rajesh Sonwane

रामू ढाकणे 

छत्रपती संभाजीनगर : रात्रीच्या सुमारास नशेखर चोर हे रुग्णालयात येत होते. मात्र तेथील कर्मचाऱ्यांनी त्यांना हटकत आतमध्ये येण्यास मज्जाव केला. त्यानंतर या तरुणांनी वाद घालून कर्मचाऱ्यांना थेट मारहाण केली. हा संपूर्ण प्रकार रुग्णालयाच्या आवारात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. 

छत्रपती संभाजीनगर (Sambhajinagar) शहरातील चिकलठाणा परिसरात असणाऱ्या महापालिकेच्या मेल्ट्रॉन हॉस्पिटलमध्ये काही नशा केलेले चोर येण्याचा प्रयत्न करत होते. मात्र रात्र पाळीला असलेल्या कर्मचाऱ्यांनी या संशयित चोरांना येण्यास मनाई केली. याचा राग आल्याने मेल्ट्रॉन हॉस्पिटलमधील तीन कर्मचाऱ्यांना (Crime News) या नशेखर चोरांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली. 

नशेखोर चोरांनी लाथा बुक्क्या आणि लाकडी दांडक्याने मारहाण करत असल्याचं दिसून आलं. यामध्ये हॉस्पिटलचे २ कर्मचारी गंभीर जखमी झाले असून मारहाणीचा हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. दरम्यान या प्रकरनी उशिरापर्यंत एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नरभक्षक वाघीण अखेर जेरबंद, पिंजऱ्यातूनच महिला डॉक्टरचा वाघिणीवर नेम

पालखीत वारक-यांना लुटणारे चोरकरी, पुण्यात वारीत चोरी, धास्तावले वारकरी, खाज-खुजली टाकून लुटणारी टोळी

एकापेक्षा अधिक लग्न केल्यास सरकारी नोकरी जाणार; राज्य सरकारचा मोठा निर्णय

ऑपरेशन टायगर 4.0 लवकर होणार? नाशिकमध्ये ठाकरेंचे 12 नगरसेवक फुटणार?

लग्नाचा हट्ट धरला, वाद टोकाला गेला; सनकी बॉयफ्रेंडनं अल्पवयीन गर्लफ्रेंडला निर्घृणपणे संपवलं, मुंबई हादरली

SCROLL FOR NEXT