Sambhajinagar Corporation Saam tv
महाराष्ट्र

Sambhajinagar News : मनपाची बालभारतीकडे ४ लाख ७२ हजार पाठ्यपुस्तकांची मागणी; मे अखेर होणार शाळांना वितरण

Sambhajinagar News : संभाजीनगर महापालिका प्रशासक जी. श्रीकांत यांच्या संकल्पनेतून पालिकेच्या शाळांमध्ये स्मार्ट स्कूल टू बेस्ट स्कूल हा उपक्रम राबविला जात आहे

Rajesh Sonwane

रामू ढाकणे 

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या शिक्षण विभागाकडून दरवर्षी उन्हाच्या दिवसात (Sambhajinagar) बालभारतीकडे पाठ्यपुस्तकांची मागणी केली जाते. यंदा या शैक्षणिक वर्षासाठी पालिकेने चार लाख ७२ हजार पाठ्यपुस्तकांची मागणी बालभारतीकडे केली आहे. (Breaking Marathi News)

संभाजीनगर महापालिका प्रशासक जी. श्रीकांत यांच्या संकल्पनेतून पालिकेच्या शाळांमध्ये स्मार्ट स्कूल टू बेस्ट स्कूल हा उपक्रम राबविला जात आहे. आगामी शैक्षणिक वर्षातही विविध उपक्रमांचे नियोजन केले जाणार आहे. दरम्यान शाळा (School) उघडण्याच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांच्या हातात पाठ्यपुस्तके मिळावी; म्हणून पालिकेच्या (Education Department) शिक्षण विभागाने ४०० शाळातील १ लाख १७ हजार ३३० विद्यार्थ्यांसाठी सुमारे ४ लाख ७२ हजार पाठ्यपुस्तकांची मागणी केली आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

शैक्षणिक वर्ष संपत असताना आगामी शैक्षणिक वर्षाची तयारी महापालिकेकडून केली जात आहे. बालभारतीकडे (Balbharti) आतापासून पाठ्यपुस्तकांची मागणी करण्यात आली आहे. मे अखेरपर्यंत शहरातील सर्व मनपा व खाजगी अनुदानित शाळांना पाठ्यपुस्तके वितरण करण्याच्या प्रशासकांच्या सूचना आहेत. मात्र शाळा सुरू होण्याच्या काही दिवसांनी किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात मागणीनुसार बालभारती कडून पुरवठा प्राप्त होण्याची अपेक्षा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Guhagar Fort : समुद्राला कवेत घेऊन दिमाखात उभा, पावसाळ्यात नक्की पाहा गुहागरजवळील 'हा' किल्ला

Maharashtra News Live Update: जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेची आज निवडणूक, अध्यक्षपदासाठी भाजपचे राहुल लोणीकर यांच नाव चर्चेत

मोदी सरकारला मोठा धक्का! ३ खासदारांचा NDA ला रामराम, राजकारणात खळबळ

Famous Actor : प्रसिद्ध अभिनेत्याने एकाच चित्रपटात साकारल्या तब्बल १६५ भूमिका, सिनेमा तुम्ही पाहिलाय का?

High cholesterol: कोलेस्ट्रॉलमुळे वाढतोय हार्ट अटॅकचा धोका; हे 5 सुपरफुड्स रक्तवाहिन्यांमध्ये साचलेली चरबी करतील कमी

SCROLL FOR NEXT