Sambhajinagar News Saam tv
महाराष्ट्र

Sambhajinagar News : बनावट विदेशी मद्य तयार करणाऱ्या एकास घेतले ताब्यात; १३ लाखाचा मुद्देमाल हस्तगत

Sambhajinagar News : राज्यात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या काळामध्ये दारूचा वापर मोठ्या प्रमाणात होत असतो. पण त्यात बनावट दारू अनेकांचा जीव घेऊ शकतो अशी स्थिती आहे

डॉ. माधव सावरगावे

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमध्ये सर्रासपणे बनावट दारू बनविली जात होती. पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर त्याठिकाणी कारवाई करण्यात आली असून बनावट विदेशी दारू तयार करणाऱ्या एकाला पोलिसांनी मुद्देमालासह ताब्यात घेतले आहे. निवडणुकीच्या काळात झालेली हि कारवाई मोठी मानली जात आहे. 

राज्यात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या (Vidhan Sabha Election) काळामध्ये दारूचा वापर मोठ्या प्रमाणात होत असतो. पण त्यात बनावट दारू अनेकांचा जीव घेऊ शकतो अशी स्थिती आहे. कारण सध्या बाजारात अनेक ठिकाणी बनावट दारू वाटप सुरू असल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यात आता छत्रपती संभाजीनगरच्या (Sambhajinagar News) गोलटगाव चौफुलीवर बनावट विदेशी मद्य तयार करणाऱ्या एकाला राज्य उत्पादन शुल्क विभागाने तैनात केलेल्या पथकाने धाड टाकत कारवाई केली आहे.

याठिकाणी दारू बनविणाऱ्या एकास ताब्यात घेतले असून त्याच्या ताब्यातून पोलिसांनी एक चारचाकीसह १२ लाख ९२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. उमेश हरिश्चंद्र वाडेकर असे या ताब्यात घेतलेल्या संशयिताचे नाव आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कारवाईसाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने ही कारवाई केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे आंदोलन

Drishyam 3 Cast Fee: 'दृश्यम 3'च्या स्टारकास्टची फी किती? अजय देवगणला तब्बूपेक्षा 528% अधिक मानधन

Pumpkin seeds: कोलेस्ट्रॉल मेणासारखं वितळेल आणि हार्ट अटॅकचा धोकाही होईल कमी, रोज सकाळी खा मूठभर 'या' बिया

Pune Accident: पुण्यात अपघाताचा थरार! भरधाव स्कूल बसची दुचाकीला धडक, विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू

Political News : राजकीय वर्तुळात मोठी घडामोड! काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचा तडकाफडकी राजीनामा, 'या' नेत्याकडे दिली जबाबदारी

SCROLL FOR NEXT