Sambhajinagar News saam tv
महाराष्ट्र

Sambhajinagar News : संभाजीनगरच्या लेडी डॉनचा हवेत गोळीबार; सिटी चौक पोलिसांकडून अटक

Sambhajinagar news : छत्रपती संभाजीनगर परिसरात हा प्रकार उघडकीस आला आहे. हवेत गोळीबार करताना तरुणीने व्हिडीओ केला असून या व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल

डॉ. माधव सावरगावे

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरातील एका लेडी डॉनचा हवेत गोळीबार करतानाचा व्हिडिओ चांगलाच वायरल झाला होता. या व्हिडीओवरून पोलिसांनी कारवाई करत सदर तरुणीला ताब्यात घेतले आहे. तसेच तिच्याकडून कट्ट्यासह काडतूस जप्त केले आहेत. 

छत्रपती संभाजीनगर (Sambhajinagar News) परिसरात हा प्रकार उघडकीस आला आहे. हवेत गोळीबार करताना तरुणीने व्हिडीओ केला असून या व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. ह्या व्हिडिओत एक २४ वर्षाची तरुणी सर्रासपणे गावठी कट्टा हातात घेऊन गोळीबार करताना दिसत आहे. या व्हिडिओबाबत सिटी चौक पोलिसांना (Police) माहिती मिळताच त्यावरून तरुणीचा शोध घेतला. यावेळी त्या तरुणीकडे एक गावठी कट्टा,एक जिवंत काडतूस, एक चाकू इत्यादी साहित्य मिळून आली. 

तरुणीवर यापूर्वीही दोन गुन्हे दाखल 

पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या राखी गणेश मुरमुरे (वय २४) असे लेडी डॉनचे नाव आहे. तिच्याकडून सर्व साहित्य जप्त करण्यात आले असून या अगोदरही छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात तिच्याविरुद्ध दोन गुन्हे दाखल आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: १ ऑगस्टपासून महिलांसाठी एनसीएमसी कार्ड सक्तीचे?

Google Pay, PhonePe, Paytm युजर्ससाठी महत्त्वाची बातमी, NPCI चा मोठा निर्णय; बंद होणार 'ही' महत्त्वाची सुविधा

Rain Alert : राज्यात पाऊस थैमान घालणार, ३१ जिल्ह्यांना हाय अलर्ट; हवामान खात्याचा अंदाज काय?

Fact-Check: सरकारची E-30 ची तयारी?2030 पर्यंत E-30 वापरणार?व्हायरल मेसेजमागचं सत्य काय?

Naivedya Thali : नैवेद्याची थाळी कशी सजवावी? 'या' सोप्या ६ टिप्स गृहिणींनी लक्षात ठेवाव्यात

SCROLL FOR NEXT