Sambhajinagar Crime Saam tv
महाराष्ट्र

Sambhajinagar Crime : रागाने बघितल्याने दोन गटात तुफान राडा; संभाजीनगरात जुन्या वादातून कुरापत, तिघे जखमी

Sambhajinagar news : जुन्या वादाच्या कारणावरून योगेशकडे रागाने पाहत होता. यावरून दोघांमध्ये वाद झाला. मात्र थोड्या वेळानंतर बिरजू तरैयावाले हा सात ते आठ जणांना घेऊन आला यामुळे वाद विकोपाला गेला होता

डॉ. माधव सावरगावे

छत्रपती संभाजीनगर : जुने भांडण असल्याने समोरून गेल्यानंतर रागाने बघितल्याच्या कारणावरून दोन गटात तुफान राडा झाला. यात एकाला जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. सदरची घटना छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज महानगर एमआयडीसी परिसरातील तिसगावमध्ये घडली आहे. या प्रकरणी १० जणांवर वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संभाजीनगरच्या तिसगावमध्ये सदरची घटना रात्रीच्या सुमारास घडली. योगेश कासुरे यांचा चुलत भाऊ राजेश कासुरे यांच्या घरासमोरून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मिरवणूक निघाली. मिरवणूक ३००- ४०० मीटर पुढे गेल्यानंतर बिरजू तरैय्यावाले हा जुन्या वादाच्या कारणावरून योगेशकडे रागाने पाहत होता. यावरून दोघांमध्ये वाद झाला. मात्र थोड्या वेळानंतर बिरजू तरैयावाले हा सात ते आठ जणांना घेऊन येत तलवार, चाकु, लोखंडी रॉड व लाठ्या काठ्या घेऊन योगेशला कसूरेला मारण्यासाठी आले. 

तिघांवर केला जीवघेणा हल्ला 

यावेळी आकाश तरैयावाले याने तलवारीने योगेशच्या छातीवर व मागील बाजूने वार केला. तर बिरजु तरैयावाले याने सुद्धा जिवे मारण्याचे उद्देशाने लोंखडी रॉडने डोक्यात जोरदार वार केला. यात योगेश हा गंभीर जखमी झाला होता. त्यानंतर योगेशला वाचवण्यासाठी आलेला त्याचा चुलत भाऊ राजेंद्र कसुरे व नरेंद्र शामलाल कसुरे यांच्यावर देखील तलवार व लोखंडी रॉडने वार करत  जखमी केले.  

दहा जणांवर गुन्हा दाखल 

दरम्यान परिसरातील काही जणांनी त्यांच्यातील भांडण सोडवले. त्यानंतर योगेश, राजेंद्र व नरेंद्र यांना जखमी अवस्थेत खाजगी दवाखान्यात उपचारासाठी नेले. सध्या योगेश कसूरेवर उपचार सुरू आहे. घटनेचेने गांभीर्य बघता छत्रपती संभाजीनगरचे पोलीस उपायुक्त नितीन बगाटे यांनी तिसगाव येथे येऊन नागरिकांची समजूत घालून शांत राहण्याचे आवाहन केले. तर या प्रकरणी वाळूज पोलिसात दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: ५ दिवसांत कॅन्सर गायब करणारा डोस? एकाच डोसने गाठी पूर्णपणे नष्ट?

Wednesday Horoscope : चुका टाळाव्यात, सरकारी कामे रखडतील; ५ राशींच्या लोकांचे वाढू शकते संकट

Maharashtra Politics: ठाकरे-पवारांच्या मदतीला फडणवीस, ऑपरेशन टायगरला फडणवीसांचा चाप?

FORM 16: १ एप्रिलपासून कर्मचाऱ्यांसाठी मोठा बदल, फॉर्म 16 ऐवजी आता भरा फॉर्म 130

Ashok Kharat Case : नाशिकच्या भोंदूच्या दरबारी राजकीय नेत्यांची हजेरी; अशोक खरातचे 40 भक्त कोण?

SCROLL FOR NEXT