Sambhajinagar News Saam tv
महाराष्ट्र

Sambhajinagar News : वर्षभरापूर्वी इंस्टाग्रामवर प्रेम; बारा वर्षीय मुलगी पुण्यातून पळून छत्रपती संभाजीनगरला, पोलीसांच्या ताब्यात

वर्षभरापूर्वी इंस्टाग्रामवर प्रेम; बारा वर्षीय मुलगी पुण्यातून पळून छत्रपती संभाजीनगरला, पोलीसांच्या ताब्यात

साम टिव्ही ब्युरो

छत्रपती संभाजीनगर : वर्षभरापूर्वी इन्स्टाग्रामवर १८ वर्षीय तरुणासोबत सूत जुळलेल्या १२ वर्षीय मुलीने तीन दिवसांपूर्वी पुण्यातील (Pune) घरातून पळ काढत थेट वेरूळ गाठले. यानंतर ही मुलगी व तरूण पोलिसांच्‍या (Police) ताब्‍यात आहेत. (Breaking Marathi News)

पुणे येथील असलेली मुलीची ओळख वर्षभरापुर्वी तरूणासोबत इंस्‍टाग्रामवरून झाली. यानंतर दोघांमध्‍ये प्रेम जुळले. दरम्‍यान पुण्यातील खडकी येथील मुलगी सोमवारी मैत्रिणीकडे जाते असे सांगून घराबाहेर पडली. एसटी बसने तिने थेट वेरूळ गाठले. घरच्यांनी आपल्याशी संपर्क साधू नये; म्हणून तिने मोबाइलमधील (Sambhajinagar) सिमकार्ड काढून फेकून दिले. वेरूळ येथे प्रियकराकडे पोहोचताच दोघांनी वाळूज औद्योगिक परिसरातील पाटोदा येथे राहणाऱ्या मुलाच्या आत्याकडे आश्रय घेण्याचा निर्णय घेतला.

नातलगांनी पोलिस ठाण्यात आणले

मुलीच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरील चॅटिंग वाचून ती छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने गेल्याची खात्री पटल्याने पोलिसांसह तिचे पालक तिला घेण्यासाठी निघाले होते. दरम्‍यान पाटोदा गावातील मुलाच्या आत्याकडे मुक्कामी असणाऱ्या दोघा प्रेमीयुगुलांना नातेवाइकांनी एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात घेऊन नेत घडलेल्या प्रकाराची माहिती दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhaata Marathi Movie: गरिबी, संघर्ष आणि मुलीचं स्वप्न; 'भाटा'मधून उलघडणार एका बापाची प्रेरणादायी गोष्ट

Maharashtra News Live Update: जळगावात भीषण अपघात; टँकरच्या धडकेत भाजी विक्रेत्या महिलेचा मृत्यू, मुलगा जखमी

Maharashtra Politics : फडणवीस-शिंदे असते तर गुंगा गुड्डा म्हटले असते, राऊतांच्या वक्तव्याने वाद उफळणार?

Morning Exercise: सकाळी उठताच फक्त ५ मिनिटे करा 'हे' व्यायाम; दिवसभर राहाल उत्साही आणि फ्रेश

Eknath Shinde : सिद्धिविनायक मंदिर देणगी घोटाळा प्रकरणात एकनाथ शिंदेंचे तातडीचे आदेश, ठाकरे सेना अडचणीत येणार?

SCROLL FOR NEXT