Sambhajinagar News Saam tv
महाराष्ट्र

Sambhajinagar : मुलीची भेट ठरली शेवटची; माघारी परतताना काळाची झडप, नाल्यातून बैलगाडी नेताना शेतकऱ्यासह बैल बुडाला

Sambhajinagar News : छत्रपती संभाजीनगर कन्नड तालुक्यातील जैतापूर ते हतनूर हद्दीच्या मध्यभागी शिवना टाकळी प्रकल्प पाण्याच्या तुंबारा असलेल्या वाघ नाल्यात शेतकऱ्यांसह बैलगाडी बुडाल्याची दुदैवी घटना सोमवारी रात्री घडली

डॉ. माधव सावरगावे

छत्रपती संभाजीनगर : मुलीची भेट घेऊन घरी येत असताना शेतकऱ्याने बैलगाडी घेऊन तलावातून मार्गस्थ होण्याचा प्रयत्न केला. मात्र लेकीची हि शेवटची ठरली. कन्नड तालुक्यातल्या शिवना टाकळीच्या वाघ नाल्याच्या पाण्यातुन बैलगाडी घेऊन मार्गस्थ होताना शेतकऱ्यासह एका बैलाचा बुडून मुत्यु झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.  

छत्रपती संभाजीनगर कन्नड तालुक्यातील जैतापूर ते हतनूर हद्दीच्या मध्यभागी शिवना टाकळी प्रकल्प पाण्याच्या तुंबारा असलेल्या वाघ नाल्यात शेतकऱ्यांसह बैलगाडी बुडाल्याची दुदैवी घटना सोमवारी रात्री घडली. कैलास उत्तमराव कोरडे (वय ५६) असे पाण्यात बुडुन मृत झालेल्या शेतकऱ्यांचे नाव आहे. कैलास कोरडे बैलगाडीने वाघ नाल्याच्या पाण्यातून आपल्या लेकीकडे पळसवाडी येथे गेले होते. ते संध्याकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास परत त्याच नाल्यातुन येत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने मोठ्या खड्ड्यात बैलगाडीसह बुडाले.

दुसऱ्या दिवशी सापडला मृतदेह 

घटनेची माहिती मिळताच आजूबाजूच्या नागरिकांनी व देवगाव रंगारी पोलिस पथकाच्या मदतीने पाण्यात रात्री उशीरापर्यंत शोधण्याचे काम केले होते. मात्र कोरडे यांचा शोध लागला नव्हता. दरम्यान मंगळवारी (ता. १७) सकाळी सहा वाजता पाण्यावर कोरडे यांचा मृतदेह तरंगताना दिसून आला. यानंतर बाळू परांडे, उमेश कोरडे यांनी पाण्यात जाऊन मृतदेह बाहेर काढला. 

एक बैल वाचला 

एका बैलाचे जोते तुटल्याने तो बैल पाण्यातून पोहून बाहेर आला. तर दुसरा बैल पाण्यात बुडून मृत्यू झाला. ग्रामस्थांनी गळ टाकून बैलगाडी ट्रॅक्टरच्या सहाय्याने बाहेर काढली. मात्र कैलास कोरडे यांचा शोध लागला नव्हता. स्थानिक पाण्यात पोहणारे मुलांनी रात्री सहा वाजेपासून रात्री दहा वाजेपर्यंत पाण्यात कोरडे यांचा शोध घेतला. मात्र त्यांचा शोध लागला नव्हता. तर सकाळी मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sleep Schedule: कधी लवकर तर कधी उशिरा झोपता? हृदयाच्या आरोग्यावर होऊ शकतो परिणाम; जाणून घ्या 'या' ७ टिप्स

Shocking : धक्कादायक! ९ महिन्याचं बाळ धावत्या एक्सप्रेसच्या खिडकीतून पडले, नंतर जे घडलं त्याने काळजाचा ठोका चुकला

"मेंटेनन्स देणार नाही, काय करायचं ते करा" असं म्हणणाऱ्या फ्लॅटधारकांना झटका; सोसायटी करू शकते 'ही' कडक कायदेशीर कारवाई

Shivali Parab: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबचा साडीतील रॉयल लूक; पेस्टल गुलाबी-लाल साडीत दिसतेय अप्सरा

Maharashtra News Live Update: वाळूच्या डंपरची दुचाकीला जोरदार धडक; दोन तरुणांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT