Sambhajinagar News Saam tv
महाराष्ट्र

Sambhajinagar : आजीला गोड बोलून गंडविले; सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद

Sambhajinagar News : परिसरातील रस्त्यावर घरी जाण्यासाठी रिक्षाची वाट पाहणाऱ्या आजीला पाहून एकजण तेथे आला. यानंतर त्याने महिलेशी गोड बोलून तुमच्या मुलाचा मित्र असल्याचे त्याने सांगितले. आजीचा विश्वास संपादन

डॉ. माधव सावरगावे

छत्रपती संभाजीनगर : घरी जाण्यासाठी रस्त्यावर रिक्षाची वाट पाहणाऱ्या वयोवृद्ध महिलेला गोड बोलून गंडविल्याची घटना संभाजीनगर शहरातील पुंडलिकनगर परिसरात घडली आहे. मुलाचा मित्र असल्याचे सांगून वृद्ध महिलेच्या अंगावरील ४ लाखाचे सोने एका चोरट्याने लांबवीले आहेत. या प्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

छत्रपती संभाजीनगर मधील पुंडलिकनगरमध्ये घडली आहे. परिसरातील रस्त्यावर घरी जाण्यासाठी रिक्षाची वाट पाहणाऱ्या आजीला पाहून एकजण तेथे आला. यानंतर त्याने महिलेशी गोड बोलून तुमच्या मुलाचा मित्र असल्याचे त्याने सांगितले. आजीचा विश्वास संपादन करून तुमच्या मुलाचा चेक आला आहे तो चेक लॅप्स होईल. त्याचे वाईट परिणाम होतात; असे सांगत मनात भीती घातली.  

दागिने घेत ठोकली धूम 

तुमचे सोन्याचे मंगलसूत्र व बांगड्या काढून द्या. मेडिकलमधून वजन करून पावती आणून देतो, अशी थाप मारली. वृद्ध महिलेचा विश्वास बसल्यानंतर त्यांनी सर्व दागिने काढून दिले. त्यानंतर दागिने हाती लागताच चोरट्याने त्या ठिकाणावरून धूम ठोकली. हा सर्व प्रकार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून ४ लाखांचे दागिने चोरट्याने पळवले आहे. याप्रकरणी पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चिपळूणमध्ये तीन घरे फोडली 

चिपळूण शहरातील खेंड विभागातील कांगडेवाडी रोड परिसरात असलेल्या हरिदर्शन बिल्डिंग आणि लक्ष्मी वैभव बिल्डिंग या दोन बिल्डिंगच्या पहिल्या मजल्यावरील फ्लॅट चोरट्याने फोडले. हरिदर्शन बिल्डिंगमधील प्रमोद धामणस्कर यांच्या घरी बंद फ्लॅटचा दरवाजा कुलूप तोडून चोरट्याने प्रवेश केला. मात्र कपाटात काहीही सापडले नाही. तर लक्ष्मी वैभव बिल्डिंगमधील सुजित मांगडे यांच्या फ्लॅटमधून सोन्याची अंगठी, कानातले दागिने आणि रोख रक्कम लंपास केली. याच बिल्डिंग मधील दुसऱ्या मजल्यावरील सागवेकर यांचा ही फ्लॅट फोडला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amla Benefits : सकाळी रिकाम्या पोटी आवळा खाल्ला तर काय होते? 'हे' ५ फायदे तुम्हाला थक्क करतील

Inspiring Story: 55 वर्षीय मिठारी गुरूजींची प्रेरणादायी कहाणी; एका विद्यार्थिनीसाठी जंगलातून 5 किमी पायपीट

Thane Firing: मोठी बातमी! ठाण्यात ठाकरे गटाच्या नेत्यावर गोळीबार, उपचारादरम्यान पूर्णेकर यांचा मृत्यू

पुणे महापालिका नोकरभरती घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई; जेजुरी देवस्थानच्या माजी विश्वस्ताला अटक

'राम श्रीमंतांचा, महादेव गरिबांचा देव'; मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचं वादग्रस्त विधान

SCROLL FOR NEXT