Sambhajinagar BJP Saam tv
महाराष्ट्र

Sambhajinagar BJP : शिंदेंना धक्का? संभाजीनगर महापालिकेसाठी भाजपकडून स्वबळाची तयारी

Sambhajinagar News : मुंबईतील प्रदेश कार्यालयात महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी येणाऱ्या पालिका निवडणुकीत भाजपचा महापौर करण्यासाठी प्रयत्न करावा अशा सूचना स्थानिक नेत्यांना दिल्या

माधव सावरगावे

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुक स्वबळावर लढण्याची तयारी भाजपने सुरू केली आहे. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस सोबत युती न करता स्वतंत्र निवडणूक लढावी; असा आग्रह भाजपच्या कार्यकर्त्यांचा व पदाधिकाऱ्यांचा असल्याने भाजपकडून महापालिका निवडणूक स्वबळावर लढण्याची तयारी सुरू करण्यात आल्याचे भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष शिरीष बोराळकर यांनी सांगितले आहे. 

मुंबईत काल महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, ओबीसी कल्याणमंत्री अतुल सावे, आमदार रवींद्र चव्हाण, आमदार चंद्रशेखर गरजे, खासदार डॉ. भागवत कराड यांच्या उपस्थितीत शहरातील माजी नगरसेवक कैलास गायकवाड आणि पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यावेळी छत्रपती संभाजीनगर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी नेत्यांना महापालिका निवडणूक स्वतंत्र लढावं असा आग्रह केला.

शिवाय मुंबईतील प्रदेश कार्यालयात महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी येणाऱ्या पालिका निवडणुकीत भाजपचा महापौर करण्यासाठी प्रयत्न करावा अशा सूचना स्थानिक नेत्यांना दिल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे छत्रपती संभाजीनगर महापालिकेमध्ये ज्या शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. त्या शिवसेनेला बाजूला सारून भाजप आपला एकहाती झेंडा घेण्याची तयारी सुरू केली आहे. 

भाजप पदाधिकाऱ्यांचा आग्रह 
छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीमध्ये भाजप आणि शिंदेसेनेची युती होणार असे शिंदेसेनेचे नेते सांगत असले, तरी शिंदेसेनेशी युती करण्यापेक्षा स्वतंत्र लढावं असा आग्रह भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांचा असल्याचं सांगितलं जात आहे. मुंबईत शहरातील माजी नगरसेवक कैलास गायकवाड आणि पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यावेळी छत्रपती संभाजीनगर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी नेत्यांना महापालिका निवडणूक स्वतंत्र लढावं असा आग्रह केल्याचे सांगितले आहे. 

शिंदे गटाच्या रणनीतीवर लक्ष 

महापालिकेच्या निवडणुकीत भाजपने आपली भूमिका स्पष्ट केल्याने आता छत्रपती संभाजीनगर महापालिकेमध्ये ज्या शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. त्या शिवसेनेला बाजूला सारून भाजप आपला एकहाती झेंडा रुग्णाची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे आता आगामी काळात शिवसेना शिंदे गटाची काय रणनीती असेल हे पाहावं लागेल. मात्र राज्य स्तरावरून याबाबत कोणीही भूमिका मांडली नसल्याने स्वतंत्र लढण्याची केवळ चर्चाच राहते का हेही पाहावं लागेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashok Kharat: भोंदू खरातचा आणखी एक कारनामा उघड, आधी अत्याचार मग महिलांचा गर्भपात करायचा

Weight Loss Drink Recipe : रिकाम्या पोटी प्या एक ग्लास 'हे' ड्रिंक, १५ दिवसांत वजन होईल कमी अन् दिसाल फिट

Maharashtra Live News Update : पुण्यात अवकाळी पावसाचा कहर पुण्यासाठी आज आणि उद्या येल्लो अलर्ट

Latur Police: लाच घेताना पोलिस निरीक्षकाला अटक, ACB ची मोठी कारवाई; पोलिस दलात खळबळ

Crime: वर्षभरापूर्वी लग्न, नवऱ्याचे अनैतिक संबंध; मृदंगाचार्य लघाणे महाराजांच्या बायकोची आत्महत्या, संभाजीनगर हादरले

SCROLL FOR NEXT