Sambhajinagar Ganesh Visarjan Saam tv
महाराष्ट्र

Sambhajinagar Ganesh Visarjan : विसर्जन मिरवणुकीत हुल्लडबाजी.. महिला- तरुणींच्या अंगावर टाकला गुलाल; ६ जण ताब्यात, १७ जणांवर गुन्हे दाखल

Sambhajinagar News : गणेश विसर्जन मिरवणूक जात असताना अचानक काही हुल्लडबाजी करणारे तरुण मद्य प्राशन करून या मिरवणुकीत शिरले आणि त्यांनी गोंधळ घालण्यास सुरवात केली

Rajesh Sonwane

रामू ढाकणे 

छत्रपती संभाजीनगर : गणेशोत्सव साजरा झाल्यानंतर अनंत चंदुर्दशीला गणरायाला वाजत गाजत निरोप देण्यात आला. दरम्यान विसर्जन मिरवणुकीत हुल्लडबाजी करत महिला व तरुणींच्या अंगावर गुलाल टाकण्याचा प्रकार संभाजीनगरच्या पुंडलिक नगर परिसरात घडला. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून ६ जणांना पोलिसांनी तांब्यात घेतले आहे. 

छत्रपती संभाजीनगर (Sambhajinagar) शहरातील पुंडलिक नगर भागातून गणेश विसर्जन मिरवणूक काढण्यात आली होती. या परिसरातील पाण्याच्या टाकीजवळ शांततेमध्ये गणेश विसर्जन मिरवणूक जात असताना अचानक काही हुल्लडबाजी करणारे तरुण मद्य प्राशन करून या मिरवणुकीत शिरले आणि त्यांनी गोंधळ घालण्यास सुरवात केली. इतकेच नाही तर मिरवणुकीत सहभागी महिला आणि तरुणींच्या अंगावर जाणून बुजून गुलाल टाकला. यावेळी मिरवणुकीत असणाऱ्या काही तरुणांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला होता. 

सहा जणांना घेतले ताब्यात 

दरम्यान या प्रकारामुळे काही वेळ वाद निर्माण झाला होता. यानंतर (Police) पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आल्यानंतर पोलीस घटनास्थळी हजर झाल्याने त्यांना ताब्यात घेतल. गुलाल टाकून हुल्लडबाजी करणाऱ्या ६ जणांना पुंडलिक नगर पोलिसांनी अटक करून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. या शिवाय इतर १७ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

निवडणूक आयोगाचा भयंकर गोंधळ! पदवीधर मतदार यादीत थेट उद्धव ठाकरेंचे नाव; राजकीय वर्तुळात खळबळ

8th Pay Commission: 2027 मध्ये सॅलरी वाढली तर 2026 च्या पैशांचं काय? 8व्या वेतन आयोगाबाबत महत्त्वाची अपडेट

Honey And Warm Water Benefits: कोमट पाण्यात मध मिक्स करून पिण्याचे फायदे काय?

Gautami Patil : गौतमी पाटीलचा आजवरचा सर्वात बोल्ड अन् ग्लॅमरस अंदाज, फोटो पाहून तुम्हीही म्हणाल 'कडक'

SCROLL FOR NEXT