Four Young Men Drown in Sambhajinagar Lake saam tv
महाराष्ट्र

ह्रदयद्रावक! तलावात पोहायला गेलेल्या 4 तरुणांचा बुडून मृत्यू; संभाजीनगरमधील मन हेलावणारी घटना

Four Young Men Drown in Sambhajinagar Lake: संभाजीनगरमध्ये तलावात पोहताना चार तरुणांचा बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. या दुर्दैवी घटनेमुळे स्थानिक समुदायाला धक्का बसला असून सुरक्षेबाबत चिंता वाढली आहे.

Bharat Jadhav

उन्हाळ्यात अनेकजण विहिर, तलाव किंवा नदी पात्रात पोहण्यासाठी जात असतात. छत्रपती संभाजीनगरमधील चार तरुणही तलावात पोहण्यासाठी गेले होते. परंतु काळाने घाला घातला आणि चारही तरुणांचा तलवात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं परिसरात शोककळा पसरली असून शोक व्यक्त होत आहे. दरम्यान या मृतांची ओळख पटली असून पोलिसांनी त्यांची नावे जाहीर केली आहेत.

मयत व्यक्तीचे नाव-

1- श्री अफान खान इस्माईल खान

वय- 17 वर्षे (अंदाजे)

2- शेख आदिल शेख मोहसीन

वय- 15 वर्षे (अंदाजे)

3- अनोळखी व्यक्ती

अग्निशामक दलाला सुरुवातीला हर्सुल तलावात तीन तरुण तलावात बुडाल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार अग्निशमन पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पथकाच्या मदतीने बचावकार्य करत तिघांचे मृतदेह तलावातून बाहेर काढले. दरम्यान तलावाच्या दुसऱ्या बाजूला आणखी एक तरुण बुडाल्याची माहिती मिळाल्यानंतर अग्निशामक दलाने तेथेही शोधमोहीम राबवली असता चौथ्या तरुणाचाही मृतदेह पाण्यात आढळून आला.

रविवारची सुट्टी असल्याने हे सर्व तरुण तलावात पोहण्यासाठी गेले होते , अशी प्राथमिक माहिती आहे. तलावात बुडालेल्या चौघांचेगी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी घाटी रुग्णालयात पाठवण्यात आले असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. या घटनेप्रकरणी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पुण्यात मुलीनेच धारदार शस्त्राने बापाला संपवलं; धक्कादायक कारण समोर

राज्यातील अनेक पेट्रोल पंपांवर ठणठणाट; डिझेल तुटवड्यानं शेतकऱी मोठ्या संकटात

Maharashtra News Live Update: नीट पेपरफुटी प्रकरणातील पालकांवर सीबीआयचे लक्ष

Maharashtra Politics: मोठी बातमी! शिंदे ठाकरेंना धक्का देण्याच्या तयारीत? खासदार थेट शिंदेसेनेच्या व्यासपीठावर

Pasta Recipe: हॉटेलमध्ये ३०० रुपयांना मिळणारा पास्ता १० मिनिटांत बनवा घरीच्या घरी, वाचा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT