Sambhajinagar Crime  Saam tv
महाराष्ट्र

Sambhajinagar Crime : बंदुकीचा धाक दाखवून सराफ व्यावसायिकाला लूटले; साडेअकरा लाखांचे दागिने घेऊन पसार 

Sambhajinagar News : रात्री संपूर्ण दिवसभरातील झालेल्या व्यवहाराचा सर्व हिशोब करून ते घरी जाण्यासाठी निघाले. याचवेळी हा सर्व प्रकार घडला आहे

डॉ. माधव सावरगावे

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर सातारा परिसरातील रेणुका माता मंदिराजवळ असलेल्या एका सराफा व्यावसायिकाला बंदुकीचा धाक दाखवून लुटण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या प्रकारात चोरटे सुमारे साडेअकरा लाखांचे दागिने घेऊन पसार झाले आहेत. 

छत्रपती संभाजीनगर (Sambhajinagar) शहरात सातारा परिसरातील रेणुका माता मंदिर रोडवर सुरेश बाबुराव कुलथे यांचे सराफा दुकान आहे. दरम्यान रात्री संपूर्ण दिवसभरातील झालेल्या व्यवहाराचा सर्व हिशोब करून ते घरी जाण्यासाठी निघाले. याचवेळी हा सर्व प्रकार घडला आहे. घरी निघत असताना दोनजण दुकानात आले. त्यांनी बंदूक काढत सुरेश कुलथे यांना धाक दाखवत दुकानातील (Crime News) दागिने घेऊन पसार झाले. 

दुकानात घुसून बंदुकीचा धाक दाखवत चोरटयांनी ११ लाख ६४ हजार रुपयांचे दागिने असलेली बॅग लंपास केल्याची घटना घडली आहे. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या प्रकरणी कुलथे यांच्या फिर्यादीवरून सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावरून पोलीस आता तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जगाला सध्या भारताची आवश्यकता: मोहन भागवत

नगरसेविका रेखा यादव यांच्याकडे दोन रेशन कार्ड, 3 मतदान कार्ड; काँग्रेसची चौकशीची मागणी

Team India : भारतीय विकेटकीपर-फलंदाजाची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा, रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडियात केलं होतं पदार्पण

Belly Fat Loss Exercise: पोटावरील चरबी कमी करण्यासाठी करा हे सोपे व्यायाम; घरच्या घरी मिळवा फिट आणि सडपातळ शरीर

Silver Jodavi Design: वटपौर्णिमेसाठी खरेदी करा खास या ७ नव्य डिझाइन्सची सिल्व्हर जोडवी

SCROLL FOR NEXT