Sambhajinagar News Saam tv
महाराष्ट्र

Sambhajinagar : पुराच्या पाण्यात कच्चा पूल गेला वाहून; प्रसूतीनंतर एक दिवसाच्या बाळाला घेत गुडघाभर पाण्यातून महिलेचा प्रवास

Sambhajinagar News : तीन दिवसांपूर्वी नदीवरील पूल वाहून गेल्याने ग्रामस्थांचा जीवघेणा प्रवास सुरु झाला. यातच प्रसूतीनंतर गावाकडे परत जाताना गुडघाभर पाण्यातून एका दिवसाच्या बाळाला घेऊन महिलेला प्रवास करावा लागले.

डॉ. माधव सावरगावे

छत्रपती संभाजीनगर : आदिवासी भागात रस्त्याअभावी रुग्णांना पायपीट करत जावे लागत असल्याचे चित्र नेहमीच पाहण्यास मिळते. मात्र संभाजीनगर जिल्ह्यात हे चित्र पाहण्यास मिळत असून गावाला जोडणारा पूल वाहून गेल्याने एका महिलेला प्रसूतीसाठी बाळाला घेऊन गुडघाभर पाण्यातून वाट काढावी लागली. सिमेंटच्या पाइपवरून जाताना हा प्रवास जीवघेणा ठरला असता. 

छत्रपती संभाजीनगरच्या सय्यदपूरमधील ही घटना आहे. सय्यदपूर येथील कोमल अजय सिरसाठ या महिलेला प्रसूती वेदना सुरु झाल्या. यामुळे तिला गुडघाभर पाण्यातून प्रवास करत आरोग्य केंद्रात जावे लागले होते. तिने सोमवारी रात्री गोंडस मुलीला लाडसावंगी आरोग्य केंद्रात जन्म दिला. यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारी सुटी झाल्याने आई आणि बाळाला परत घरी जाताना गुडघाभर पाण्यातून जावे लागले. 

पक्क्या पुलाचे काम ठेवले अपूर्ण 

सय्यदपूर- लाडसावंगी या गावाला जोडणारा दुधना नदीवर मुख्यमंत्री सडक योजनेमधून पुलाला मंजुरी मिळाली होती. या पुलाचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण होऊ शकत होते; परंतु संबंधित ठेकेदाराने व अभियंत्यांनी लक्ष न दिल्याने पुलाचे काम पूर्ण झाले नाही. दरम्यान सय्यदपूर गावाला तात्पुरत्या स्वरूपात चार नळकांडी टाकून थातूरमातूर पूल तयार करण्यात आला होता; परंतु २६ जुलैला आलेल्या पुरात हा पूल वाहून गेला. 

विद्यार्थ्यांचाही पाण्यातून प्रवास 

दुधना नदी उगमक्षेत्रात व लाडसावंगी परिसरातील गावात जोरदार पाऊस झाल्याने रात्री आठ वाजता मोठा व पहिला पूर आला. या पुरात तात्पुरता बनवलेला पूल वाहून गेला. परिणामी सय्यदपूर गावात जाणारा एकमेव पूल वाहून गेल्याने नागरिकांसह विद्यार्थी, रुग्णांचा लाडसावंगीशी संपर्क तुटला. सोमवारी शाळेत न गेलेल्या विद्यार्थ्यांनी मंगळवारी गुडघाभर पाण्यातून शाळा गाठली. मात्र पाल्य शाळेत जाताना व परत येण्याच्या वेळेत नदीकाठी येऊन थांबण्याची वेळ पालकांवर आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rakul Preet Singh: प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीला झटका, आयकर विभागाकडून घरासह १२ ठिकाणी छापेमारी, नेमकं प्रकरण काय?

संपूर्ण गावच विक्रीला काढलं! ग्रामस्थांचा टोकाचा निर्णय

Homemade Honey Recipe : बाजारातलं महागडं मध खरेदी करणं सोडा, घरच्या घरी फक्त ३ पदार्थांपासून 'असे' बनवा शुद्ध मध!

Maharashtra News Live Update: उज्जैनमध्ये शाही मस्जिदचा वाद पेटला पोलिसांकडून लाठी चार्ज

Sanjay Raut: खासदार संजय राऊतांचे FDA अधिकाऱ्यांवर खळबळजनक आरोप; थेट तुकाराम मुंढेंना पत्र धाडलं

SCROLL FOR NEXT