Sambhajinagar Accident Saam tv
महाराष्ट्र

Sambhajinagar Accident : टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वार ठार, एकजण गंभीर जखमी

Sambhajinagar News : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अडुळ येथे धुळे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर हा अपघात झाला आहे.

Rajesh Sonwane

रामू ढाकणे 

छत्रपती संभाजीनगर : दुचाकीला समोरून येणाऱ्या टेम्पोने जोरदार धडक दिली- या अपघातात दुचाकीवरील एकाच जागीच मृत्यू झाला. तर दुसरा एकजण गंभीर जखमी झाला आहे. अपघातानंतर वाहन चालक घटनास्थळावरून फरार झाला आहे. तर जखमीला लागलीच उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

छत्रपती संभाजीनगर (Sambhajinagar) जिल्ह्यातील अडुळ येथे धुळे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर हा अपघात झाला आहे. या अपघातात एका टेम्पोच्या धडकेत दुचाकीवर असणाऱ्या एका जणांचा जागीच मृत्यू झाला. तर इतर एक जण हा गंभीर जखमी झाला आहे. दुचाकीवरील दोघे जण आडूळ शिवारातील एका हॉटेलवर चहा घेऊन परत येत होते. मात्र रस्ता ओलांडताना पाचोडकडून भरधाव वेगात आलेल्या एका टेंपोने दुचाकीला जोराची (Accident) धडक दिली. यात अवधूत माणिकराव वाघ (वय ४३) या व्यक्तीचा मृत्यू झाला. तर त्याच्यासोबत असणारा सहकारी हा गंभीर जखमी झाला आहे. 

अपघात घडल्यानंतर परिसरातील नागरिक घटनास्थळी जमा झाले. घटनेतील जखमीला लागलीच रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले. तर घटनेची माहिती पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी येत पंचनामा केला. मात्र हा अपघात झाल्यानंतर टेम्पो चालक हा वाहन घेऊन पसार झाला आहे. त्याचा शोध पोलीस घेत आहेत. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: टोमॅटो दरात घसरण 20 किलोच्या क्रेटला मिळतोय 100 ते 125 रुपयाचा दर

Pune Water Cut: पुणेकरांनो पाणी जपून वापरा, गुरूवारी पाणीपुरवठा राहणार बंद; कोणत्या भागांना बसणार फटका?

Mobile Safety Tip : मोबाईल भिजल्यावर तांदळाच्या डब्यात ठेवताय? जाणून घ्या खरंच फोन दुरूस्त होतो का

पोलीस खात्यात बदल्यांचा 'पार्ट-२'! एका अधिकाऱ्याची तडकाफडकी बदली, दुसऱ्याची बदलीनंतरही 'तीच' खुर्ची कायम

Raksha Bandhan 2026: रक्षाबंधनाला सोने-चांदीची राखी बांधावी का? जाणून घ्या पारंपारिक धाग्याच्या राखीचे खास महत्त्व

SCROLL FOR NEXT