संभाजीराजे छत्रपती Saam Tv News
महाराष्ट्र

'त्या' वेळी सर्व पक्षीय प्रतिनिधींनी यावे; संभाजीराजेंचे आवाहन

Siddharth Latkar

सातारा : खासदार संभाजीराजे छत्रपती हे येत्या दाेन सप्टेंबरला राष्ट्रपती रामनाथ काेविंद यांची भेट घेणार आहेत. मराठा आरक्षणाच्या maratha reservation मुद्यावर चर्चा करण्यासाठी आणि मराठा समाजाच्या वतीने त्यांच्या भावना व्यक्त करण्यासाठी ही भेट असल्याचे त्यांनी ट्विटमध्ये नमूद केले आहे.

मराठा समाजाल आरक्षण मिळावे यासाठी, १२७ व्या घटनादुरुस्ती विधेयक असाे अथवा नांदेड येथे समाजाच्या सामान्या कुटुंबावर गुन्हे दाखल करुन अन्याय झाल्याची भावना असाे या विषयी सातत्याने खासदार संभाजीराजे छत्रपती हे समाज माध्यमातून त्यांचे विचार आणि ध्येय पुर्ण हाेई पर्यंत मी स्वस्थ बसणार नाही हे सूचित करीत आहेत. मराठा समाजातील खदखद आणि इतर मुद्यांवर चर्चा करण्यासाठी खासदार संभाजीराजेंनी राष्ट्रपती रामनाथ काेविंद यांना भेट मागितली हाेती. त्यास राष्ट्रपतींनी समंती दिल्याचे राजेंनी ट्विट करुन माहिती दिली आहे.

येत्या दाेन सप्टेंबरला खासदार संभाजीराजे छत्रपती हे राष्ट्रपतींच्या भेटीस जाणार आहेत. त्यावेळी ते मराठा आरक्षणाबाबत चर्चा करणार आहेत. दरम्यान या भेटीत मराठा समाजातील खासदार आणि राज्यातील सर्व पक्षीय प्रत्येकी एक खासदार प्रतिनिधी यांनी उपस्थित राहावे असे आवाहन संभाजीराजे छत्रपती यांनी ट्विटमध्ये केले आहे.

मराठा समाजातील खासदारांनी तेथे उपस्थित राहावे यासाठी त्यांनी सर्व पक्षाचे अध्यक्ष व गटनेत्यांशी पत्र व्यवहार केला आहे. गेल्या काही दिवसांपासून खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी राज्य सरकारने मराठा आरक्षणासाठी ठाेस आणि तातडीने पावले उचलावीत यासाठी राज्यातील विविध जिल्ह्यात मूक आंदाेलन छेडले हाेते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Eknath Shinde : महाराष्ट्रात घडामोडींना वेग! एकनाथ शिंदे थेट दिल्लीत; मोदींच्या भेटीनंतर राजकारणाला नवी दिशा मिळणार?

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

RBI Repo Rate: तुमचा हप्ता पुन्हा महाग होणार? RBI च्या बैठकीतून समोर आली धडकी भरवणारी बातमी

Home Remedies : घरात वारंवार कोळ्याची जळमट होतायत? 'हे' 6 उपाय दूर करतील तुमचं टेन्शन

Heart Attack : डोळ्यांत दिसतात हार्ट अटॅकचे 'हे' ५ संकेत, चुकूनही करू नका दुर्लक्ष

SCROLL FOR NEXT