Sambhaji Raje Latest Marathi News, Sambhaji Raje News,  Saam Tv
महाराष्ट्र

मोठी बातमी! संभाजीराजेंना शिवसेनेची उमेदवारी नाहीच; सूत्रांची साम टीव्हीला माहिती

शिवसेनेच्या दोन जागांवर कुणाची वर्णी लागणार हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लवकरच स्पष्ट करणार आहे

साम टिव्ही ब्युरो

मुंबई : राज्यात सध्या राज्यसभेच्या (Rajyasabha Election 2022) सहाव्या जागेवरुन राजकारण तापलं असतानाच, राजकीय क्षेत्रातून एक मोठी बातमी समोर आली आहे. शिवसेनेच्या (Shivsena) दोन जागांवर कुणाची वर्णी लागणार हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) लवकरच स्पष्ट करणार आहे. शिवसेनेचा एक उमेदवार ठरला असून कोल्हापुरातून संजय पवार (Sanjay Pawar) यांना राज्यसभेची उमेदवारी मिळणार असल्याची माहिती आहे. तर दुसरीकडे संभाजीराजे छत्रपती (SambhajiRaje Chatrapati) यांना शिवसेनेकडून उमेदवारी मिळणार नाही अशी माहिती सूत्रांनी साम टीव्हीला दिली आहे. (Sambhaji Raje Latest Marathi News)

राज्यात सध्या राज्यसभेच्या सहाव्या जागेवरुन राजकारण पेटलं आहे. सहावी जागा ही शिवसेनेकडे असणार आहे. राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसेनेने सहावा उमेदवार देण्याचे जाहीर केले. तसेच या उमेदवाराच्या नावावर शिक्कामोर्तब करून त्याची घोषणा करण्याची औपचारिकता बाकी आहे, असे असतानाच संभाजीराजे छत्रपतींना शिवसेना राज्यसभेची उमेदवारी देण्यात नाही अशी माहिती सूत्रांनी साम टीव्हीला दिली आहे.

मुख्यमंत्र्यांसोबत संभाजीराजेंची फोनवरून चर्चा

संभाजीराजे छत्रपती यांनी सकाळी आपली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी सविस्तर चर्चा झाली आहे, अशी माहिती दिली. तसेच, माध्यमांसोबत बोलताना त्यांनी मुख्यमंत्री छत्रपती घराण्याचा मान राखतील अशी आशा त्यांनी व्यक्त केली. यानंतर संभाजीराजे छत्रपती हे तातडीने मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबरोबर झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर संभाजीराजे कोल्हापूरहून मुंबईला निघाले असल्याचं सांगितलं जात आहे.

"अपक्ष उमेदवाराला शिवसेना पाठिंबा नाही"

"कोणत्याही अपक्ष उमेदवाराला शिवसेना पाठिंबा करणार नाही. दोन्ही उमेदवार शिवसेनेचाच असणार आहे. हा शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा निर्णय आहे. राज्यसभा दोन्ही जागांसाठी पुरेसं नाही तर जास्त संख्याबळ आहे", असा दावाच खासदार संजय राऊत यांनी केला आहे. तसंच, राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी उद्या शिट्टी वाजेल. आम्ही निरोपाची वाट बघत नाही. 2 जागा शिवसेना लढवणार आणि जिंकणार आहे, असंही राऊत म्हणाले होते.

दरम्यान, संभाजीराजे यांनी हाती शिवबंधन बांधण्यास नकार दिल्याने शिवसेनेकडून संभाजीराजेंना उमेदवारी मिळणार नसल्याची माहिती आहे. त्यामुळे आता संभाजीराजे मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर हाती शिवबंधन बांधणार की, अपक्ष निवडणूक लढवणार हेच पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rohit Shetty House Firing: 'पुढच्या वेळी, छातीवर गोळी...'; रोहित शेट्टीच्या घरावर झालेल्या गोळीबाराची जबाबदारी कोणी घेतली?

NCP President : राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी कोण? प्रफुल्ल पटेलांचं नाव घेणारे पियुष गोयल यांची दिलगिरी; म्हणाले, दिशाभूल...

Maharashtra Live News Update: बजेटमध्ये महाराष्ट्रापेक्षा गुजरातला वाटा जास्त - बच्चू कडू

Crime: ४ वर्षांच्या मुलीवर बलात्कार, २४ वर्षीय तरुणाचं भयंकर कृत्य; घरासमोरून अपरहण केलं, नंतर...

भाजपच्या सभेवेळी शिंदेसेनेच्या प्रचाराची गाडी गेली, आमदार पडळकर समर्थकांनी फोडली; निवडणुकीत राडा

SCROLL FOR NEXT