sambhaji patil nilangekar, amit deshmukh, latur news saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics : 'भाजपात येतो अशी केवळ त्यांची हवा अन् त्यांनी पक्षात आलेले कार्यकर्त्यांना आवडणार नाही'

यावर भाजपातून आणि काँग्रेसमधूनही कधीही उघड बोललं गेलं नाही.

दिपक क्षीरसागर

Maharashtra Politics : देशमुख भाजपात येत नाहीत आणि आम्ही त्यांना घेत नाहीत असा टोला भाजप आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी आमदार अमित देशमुख यांना लगावला. मागील अनेक दिवसापासून लातूर येथील आमदार बंधू अमित देशमुख आणि धीरज देशमुख हे भाजपात (bjp) येणार अशी चर्चा होती. (Maharashtra News)

यावर भाजपातून आणि काँग्रेसमधूनही कधीही उघड बोललं गेलं नाही. सगळ्यांनी सावध भूमिका घेतली होती. संभाजी पाटील निलंगेकर यांनी नुकतीच स्पष्ट भूमिका मांडली. लातूर जिल्हा भारतीय जनता युवा मोर्चाचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात पाटील (sambhaji patil nilangekar latest marathi news) बोलत होते.

लातूरचे प्रिन्स राजकुमार असलेले आमदार अमित देशमुख हे आमदार अमित देशमुख हे कधीही जनतेचा प्रश्न घेऊन लोकात गेलेले नाहीत. आता भाजपात येतो अशी हवा त्यांनी निर्माण केली होती. त्यांना सतत सत्तेत राहण्याचा सोस आहे. मात्र, त्यांना आम्ही भाजपात घेणार नाही आणि ते त्यांचं भाजपात आलेले कार्यकर्त्यांना बिलकुल आवडणार नाही, असे वक्तव्य संभाजी पाटील निलंगेकरांनी (sambhaji patil nilangekar) केलं.

यावेळी युवा मोर्चाचचे प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर उपस्थितीत होते. यावेळी आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी भाजपाच्या तरुण कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं.आमदार अमित देशमुख (amit deshmukh) आणि आमदार धीरज देशमुख हे भाजपात येण्याच्या चर्चेवर अखेर पडदा पडला आहे. दरम्यान, भाजप महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या तयारीला लागल्याचे चित्र दिसत आहे. कारण मनपाच्या 80 टक्के जागेवर 35 च्या आतल्या तरुणांचीच निवड केली जाईल असं पाटील यांनी सांगितले. पक्षातील दिग्गजांना धक्का देण्याचं तंत्र भाजपाने वापरलं आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today: सोनं खरेदीची सुवर्णसंधी! १ तोळा सोन्याचे दर किती? वाचा 18k- 22k आणि 24k चे आजचे दर

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

Phone battery: प्रत्येकवेळी मोबाईल 100% चार्ज करणं योग्य आहे का?

Eknath Shinde : महाराष्ट्रात घडामोडींना वेग! एकनाथ शिंदे थेट दिल्लीत; मोदींच्या भेटीनंतर राजकारणाला नवी दिशा मिळणार?

RBI Repo Rate: तुमचा हप्ता पुन्हा महाग होणार? RBI च्या बैठकीतून समोर आली धडकी भरवणारी बातमी

SCROLL FOR NEXT