Sambhaji Nagar News Saam tv
महाराष्ट्र

Sambhaji Nagar News: पहिली बायको सोडली, दुसरीसोबत लिव्ह इनमध्ये असताना तिसरीही प्रेमाच्‍या जाळ्यात

पहिली बायको सोडली, दुसरीसोबत लिव्ह इनमध्ये असताना तिसरीही प्रेमाच्‍या जाळ्यात

साम टिव्ही ब्युरो

नवनीत तापडीया

छत्रपती संभाजीनगर : एका लग्‍नाची दुसरी गोष्‍ट ऐकली आहे. अर्थात लग्‍नाची (Marriage) बायको असताना देखील दुसरीसोबत संबंध ठेवल्‍याचे अनेक प्रकार पहावयास मिळतात. परंतु, छत्रपती संभाजीनगरातील (Sambhaji Nagar) इसमाने पहिलीच नाही तर दुसरीला सोडून तिसरीसोबत संबंध ठेवल्‍याचा प्रकार समोर आला आहे. (Live Marathi News)

पहिली बायको असताना तिला सोडून दुसरीसोबत राहत असल्याचे अनेक प्रकार यापूर्वी देखील समोर आले आहेत. पण छत्रपती संभाजीनगरमधील एका ४१ वर्षीय इसमाने त्यापुढे जाऊन पराक्रम केला आहे. लग्नाची पहिली बायको चार मुलांसह सोडून गेल्याने त्याने दुसरीसोबत लिव्ह इनमध्ये राहण्याचा निर्णय घेतला. दरम्यान तिच्यापासून एक मुलगी झाली. पण हा बाबा एवढ्यावरच थांबला नाही. घरातून रुसून आलेल्या बायकोच्या अल्पवयीन मैत्रिणीलाही त्याने आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढले.

अखेर तो पोलिसांच्‍या ताब्‍यात

विशेष म्हणजे तिला देखील कुमारी माता बनवली. शेवटी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने (एएचटीयू) याला शोधून बेड्या ठोकल्या आहे. सुभाष फकिरा राठोड असे या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी आरोपीविरुद्ध पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला न्यायालयात हजर केले असता 6 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आषाढी एकादशी स्पेशल! नाश्त्यासाठी झटपट बनवा उपवासाचे स्टफ अप्पे

Red lights on towers: उंच टॉवरवर का चमकत असते लाल रंगाची लाईट?

Maharashtra News Live Update: जंतर मंतर येथील आंदोलनाच्या समर्थनार्थ भिवंडीत तिरंगा रॅली, हजारोंचा सहभाग

Politics : राजकारणात मोठी उलथापालथ! माजी मुख्यमंत्र्यांच्या निष्ठावान नेत्यानं साथ सोडली; भाजपने डाव टाकला

धर्मेंद्र प्रधान राजीनामा देणार नाहीत? नीट पेपरफुटी प्रकरणी मोदी सरकारची ठाम भूमिका

SCROLL FOR NEXT