Sambhajinagar News Saam tv
महाराष्ट्र

Sambhajinagar News: इलेक्ट्रिक वायरला डंपरचा स्पर्श; चालक थोडक्‍यात बचावला

इलेक्ट्रिक वायरला डंपरचा स्पर्श; चालक थोडक्‍यात बचावला

साम टिव्ही ब्युरो

नवनीत तापडीया

छत्रपती संभाजीनगर : मातीने भरलेला डंपर खाली करताना डंपरचा इलेक्ट्रिक वायरला स्पर्श झाला. यामुळे लागलेल्या आगीत (Fire) हायवाची केबिन जळून भस्म झाली. सुदैवाने चालक बचावला आहे. (Maharashtra News)

छत्रपती संभाजीनगरच्‍या एमआयडीसी वाळूज परिसरातील महावीर चौकात ही घटना आज दुपारच्‍या सुमारास घडली. या परिसरात काही काम सुरू असल्‍याने डंपरद्वारे मातीची वाहतूक सुरू आहे. यात माती घेवून आलेला डंपर खाली केला जात होता. याचवेळी वर असलेल्‍या इलेक्‍ट्रीक तारेला डंपरचा स्‍पर्श होवून कॅबिनमध्‍ये आग लागली.

चालक बचावला

या घडलेल्या घटनेत हायवा चालकाने प्रसंगावधान राखून केबिनमधून खाली उडी घेतल्याने मोठा अनर्थ टळला. वेळीच दक्ष नागरिकांनी एमआयडीसी वाळूज अग्निशमन दलाला पाचारण केले. वेळीच अग्निशमन दलाने (Fire Brigade) आगीवर नियंत्रण मिळवत आग विझवली. मात्र या घटनेत हायवा मालकाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: छत्रपती संभाजीनगर : आगीतून वाचवले; पण जुळ्या चिमुकल्यांना नियतीने हिरावले

Plane Accident : भीषण अपघात! विमान धावपट्टीवरून घसरलं, क्षणात पेट घेतला; ५ जणांचा मृत्यू

Bad cholesterol: फक्त या 6 पदार्थांचा करा दररोजच्या आहारात समावेश; नसांना चिकटलेलं कोलेस्ट्रॉल खेचून काढतील बाहेर

Haunted Forts : जगातील ५ सर्वात भयानक किल्ले; सूर्यास्तानंतर जिथे पक्षीही फिरकत नाहीत

Kidney Stones : वारंवार किडनी स्टोन होतो? 'या' ५ चुकीच्या सवयी कारणीभूत; वेळीच बदला, नाहीतर...

SCROLL FOR NEXT