Sambhaji bhide saam tv
महाराष्ट्र

Maratha reservation : मराठा म्हणजे वाघ आणि सिंह, आरक्षण कुठे घेऊन बसलात? - संभाजी भिडे

Maratha reservation : मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) मराठा आरक्षणासाठी अनेकदा आरक्षणाला बसले आहेत, त्याशिवाय राज्यभर दौराही केला आहे.

Namdeo Kumbhar

Maratha reservation : मराठा आरक्षणामुळे राज्यातील राजकारण तापले आहे. मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) मराठा आरक्षणासाठी अनेकदा आरक्षणाला बसले आहेत, त्याशिवाय राज्यभर दौराही केला आहे. मराठा आरक्षणाबाबत संभाजी भिडे (Sambhaji bhide) यांनी मोठं वक्तव्य केले आहे. वाघ आणि सिंहाने आरक्षण मागावे का? मराठ्यांनो उभा देश चालवायचं आहे. आरक्षण कुठे घेऊन बसलाय? असे वक्तव्य शिवप्रतिष्ठान प्रमुख संभाजी भिडे यांनी केले आहे. ते सांगलीमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते.

संभाजी भिडे काय म्हणाले ?

सांगलीत बोलताना संभाजी भिडे म्हणाले की, मराठा म्हणजे तुम्ही वाघ आणि सिंह आहात. तुम्ही उभा देश चालवायचा आहे, आरक्षण कुठे घेऊन बसलाय, असा सल्ला शिवप्रतिष्ठान प्रमुख संभाजी भिडे यानी मराठा समाजाला सल्ला दिला आहे.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जरी चांगली असली तरी यामध्ये महिलांना मानधन देऊन नव्हे त्यांच्या केसाला धक्का लागणार नाही, याचीही व्यवस्था राज्य सरकारने करावी असा सल्लाही संभाजी भिडे यांनी राज्य सरकारला दिला. संभाजी भिडे यांनी यावेळी एकनाथ शिंदे यांच्या कामाचे कौतुकही केले.

बांगलादेशातील अत्याचार थांबवा -

बांगलादेशात हिंदू बांधवांवर होणाऱ्या अत्याचारांच्या निषेधार्थ शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आक्रमक झाले आहे. त्या निषेधार्थ 25 ऑगस्ट रोजी सांगली जिल्हा बंदची हाक दिली आहे. बांगलादेशातील अत्याचार थांबवा अशी आर्त हाक संभाजी भिडे गुरुजी यांनी सरकारला मारली आहे. बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचार थांबवण्यासाठी सरकारने अशी पावले उचलली पाहिजेत की तिकडे सुरू असणार नंगानाच थांबला पाहिजे. याचाच निषेध करण्यासाठी 25 ऑगस्ट रोजी सांगली जिल्हा बंदची हाक भिडे गुरुजींनी दिली. 20 तारखेला रॅली काढून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन 25 ऑगस्ट रोजी संपूर्ण सांगली जिल्हा कडकडीत बंद ठेवण्याची घोषणा गुरुजींनी सांगलीत पत्रकार परिषदेत केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Skin Care Tips : ऑक्टोबर हिटमध्ये चेहरा काळा पडतोय? लगेच करा 'हे' ६ सोपे उपाय; त्वचेचा ग्लो तसाच राहील

Investment Plan Fact Check: 22 हजार गुंतवा, रोज 90 हजार कमवा? अर्थमंत्र्यांच्या घोषणेचा व्हिडिओ व्हायरल?

Thursday Horoscope: स्वामिंची कृपा होणार! 5 राशींच्या व्यक्तींचे पैशाचे अडथळे दूर, वाचा गुरुवारचे राशीभविष्य

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

SCROLL FOR NEXT