Sambhaji Bhide’s latest statement calling Dandiya “effeminacy” has sparked outrage across Maharashtra. Hindu groups demand action while political leaders debate the issue in Sangli. Saam Tv
महाराष्ट्र

Sambhaji Bhide: दांडिया खेळणं म्हणजे नपुंसकता; संभाजी भिडेंच्या वक्तव्याने महाराष्ट्रात पेटला वाद

Political Storm in Maharashtra: दांडिया खेळणं म्हणजे नपुंसकता... असं वादग्रस्त वक्तव्यंच संभाजी भिडेंनी केलंय...मात्र भिडेंच्या वादग्रस्त वक्तव्याचे कसे पडसाद उमटलेत? आणि संभाजी भिडेंनी याआधी कोणते वादग्रस्त वक्तव्य केलेत?

Bharat Mohalkar

सतत वादग्रस्त वक्तव्यांसाठी कुप्रसिद्ध असलेल्या संभाजी भिडेंनी नवरात्रोत्सवाबद्दल वक्तव्य करुन नव्या वादाला तोंड फोडलंय.. संभाजी भिडेंनी नवरात्रोत्सवात दांडिया खेळणाऱ्यांना थेट नपुंसक म्हटलंय..

भिडे एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी संविधानाबद्दलही पुन्हा वादग्रस्त वक्तव्य केलंय..याच भिडेंच्या वादग्रस्त वक्तव्यांच्या मालिकेवर पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाडांना प्रश्न विचारला असता आव्हाडांनी तर हातच जोडलेत...

खरंतर संभाजी भिडे आणि वाद या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.. याआधीही संभाजी भिडेंनी भारताच्या स्वातंत्र्यदिनाबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं..

हेच भिडे हिंदूंचा पवित्र सण असलेल्या नवरात्रीत दांडिया खेळणाऱ्यांना नपुंसक म्हणत आहेत.. त्यामुळे हिंदूंच्या भावना दुखावल्याबद्दल हिंदूत्ववादी संघटना भिडेंचा निषेध करणार का? आणि सरकारही भिडेंवर कडक कारवाई करणार का याकडे राज्याचं लक्ष लागलंय..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: परभणीत राष्ट्रवादी अजित पवार पक्षातील दोन्ही गट स्वबळावर लढण्यासाठी ठाम

Hair Care: हजारो रुपयांच्या केराटिन ट्रीटमेंट्स कशाला? या ७ घरगुती कंडिशनरने केस बनवतील सिल्की आणि सॉफ्ट

Manikrao Kokate : कोकाटेंचे मंत्रिपद, आमदारकी जाणार? अंजली दमानियांनी सांगितले कारण

New Year Celebration : नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी घराचे अशा पध्दतीने करा भन्नाट डेकोरेशन

Manikrao Kokate : कोकाटेंची खाती कोणाला द्यायची ते सांगा?, मुख्यमंत्री फडणवीसांचा अजित पवारांना थेट सवाल

SCROLL FOR NEXT