महाराष्ट्र

आडनावावरून नाही तर जातीवरून जनगणना करा; राज्यसरकार विरोधात समता परिषद आक्रमक

विनोद जिरे

बीड - ओबीसींच्या आडनावावरून केल्या जात असणाऱ्या जनगणनेवरून, राज्य सरकार (State Government) विरोधात समता परिषद आता चांगलीच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. आडनावावरून नाहीतर जातीवरून जनगणना करा, ही मागणी घेऊन बीडमध्ये समता परिषदेने मोर्चा काढत निदर्शने केली आहेत. तसेच चुकीच्या पद्धतीने सुरू असलेली जनगणना तात्काळ थांबवा, अन्यथा महाराष्ट्रभर आंदोलन करू इशारा देखील समता परिषदेकडून देण्यात आला आहे.

हे देखील पाहा -

बाठिया आयोगाकडून ओबीसीचा इंम्पिरिकल डाटा चुकीच्या पद्धतीने संकलित केला जात आहे. त्यामुळे ओबीसीच्या पिढ्या-पिढ्यांचे नुकसान होणार आहे. त्यामुळे समस्त OBC समाजातील सर्व समाज घटकांमध्ये, बाठीया आयोगाच्या विरोधात रोष निर्माण झाला आहे. व्यक्तींचे आडनाव हे अनेक जातींमध्ये सारखेच असतात, त्यामुळे कोणत्या आडनावाचा व्यक्ती कोणत्या जातीमध्ये आहे, हे ओळखता येत नाही. त्याचबरोबर बाठीया आयोगाकडून सुरू असणारे, इंम्पिरिकल डेटा गोळा करण्याचे काम, हे एका रूममध्ये बसून केले जात आहे.

त्यामुळं ओबीसी समाजाचे नुकसान होत आहे, त्याचबरोबर विद्यार्थ्यांचे देखील शैक्षणिक नुकसान होणार आहे. त्यामुळे हे सुरू असलेले जनगणनेचे काम तात्काळ थांबवा आणि जातीवरून जनगणना करा. अशी मागणी समता परिषदेचे मराठवाडा अध्यक्ष ऍड सुभाष राऊत यांनी केली आहे. दरम्यान, राज्य सरकारने ही जनगणना तात्काळ थांबले नाहीत तर महाराष्ट्रभर समता परिषद तसेच ओबीसी संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. असा इशारा देखील ऍड सुभाष राऊत यांनी दिला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Special Report : जिकडे तिकडे नोटाच नोटा! मंत्र्याच्या सचिवाकडे कोटींचं घबाड

Special Report : मराठी Vs गुजराती मुंबईत वातावरण तापलं, शिवसैनिकांना नो एंट्री!

MI vs SRH: मुंबईने हैदराबादचं वादळ रोखलं! पलटणला जिंकण्यासाठी १७४ धावांचं आव्हान

Today's Marathi News Live: सुजय विखे पाटील यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी घेणार सभा

Maharashtra Politics : ...मग बघू कोणाची हिंमत होते; 'नोकरीत मराठी माणूस नको' पोस्टनंतर मनसे आक्रमक

SCROLL FOR NEXT