समाजवादी पार्टी
समाजवादी पार्टी भूषण अहिरे
महाराष्ट्र

केंद्र सरकार व राज्य सरकारच्या महागाई धोरण विरोधात समाजवादी पार्टी आक्रमक

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

भूषण अहिरे

धुळे : गेल्या काही दिवसांपासून महागाई अधिकच वाढत चालल्याने सर्वसामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेर ही दरवाढ जात आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा महागाईचा मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे आज सरकारच्या विरोधामध्ये समाजवादी पार्टीतर्फे आंदोलन करण्यात आले आहे. Samajwadi Party agitation against the central and state governments inflation policy

दीड वर्षापासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर टप्प्याटप्प्याने लॉकडाउन लावण्यात आले. त्यामुळे बहुतांश नागरिकांच्या हातचे काम गेल्याने बेरोजगारीची वेळ येऊन ठेपली आहे. यात हातचे काम गेल्याने सर्वसामान्य नागरिक आर्थिक संकटात सापडले आहेत. केंद्र सरकार व राज्य सरकारच्या विविध टॅक्स वाढीमुळे महागाईचा भडका आणखीनच वाढला आहे.

सर्वसामान्य नागरिकांवर उपासमारीची वेळ येऊन ठेपली असल्यानंतर केंद्र सरकार व राज्य सरकारच्या विरोधामध्ये समाजवादी पार्टीतर्फे धुळ्यातील चाळीसगाव रोड परिसरातील लोकमान्य हॉस्पिटलच्या चौकामध्ये लक्षणीय आंदोलन करण्यात आले आहे.

हे देखील पहा -

यावेळी राज्य सरकार व केंद्र सरकारच्या महागाई विरोधी धोरणाच्या विरोधामध्ये घोषणाबाजी देखील करण्यात आली आहे. तसेच आंदोलक संतप्त झाल्यामुळे आंदोलनाला हिंसक वळण लागू नये यासाठी पोलीस प्रशासनातर्फे तात्काळ हस्तक्षेप करून समाजवादी पार्टीच्या आंदोलकांना ताब्यात घेण्यात आले आहे.

Edited By-Sanika Gade

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heatwave Care: उष्माघाताच्या त्रासापासून वाचण्यासाठी 'अशी' काळजी घ्या

Today's Marathi News Live : नागपूर एअरपोर्ट बॉम्बने उडवू; धमकीच्या मेलने खळबळ

Viral Video: मस्ती केली, चांगलीच जिरली! भररस्त्यात तरुण खुर्ची टाकून बसला; पुढं जे घडलं ते... धक्कादायक VIDEO

शिर्डीतील साईनाथ रुग्णालयात डायलिसिस सुविधा मिळणार मोफत, साई भक्ताकडून 24 लाखाच्या मशीनची देणगी

Mumbai Local News Today: लोकलचा डबा रुळावरुन घसरला! कुठे? कधी? कसा? हार्बर लाईनने प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी

SCROLL FOR NEXT