samadhan patil  saam tv
महाराष्ट्र

Nandurbar News : भारनियमनास कंटाळून युवा शेतक-यानं संपवलं जीवन

या घटनेमुळं पाटील कुटुंबियावर शाेककळा पसरली आहे.

दिनू गावित

नंदुरबार : आसाणे येथील तरुण (youth) शेतकर्‍याने (farmer) रोजच्या भारनियमनाला व कर्जबाजारीला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना समाेर आली आहे. समाधान हिरामण पाटील (वय ३८) असे आत्महत्या केलेल्या युवा शेतक-याचे नाव आहे. समाधान याच्या जाण्याने पाटील कुटुंबावर शाेककळा पसरली आहे.

नंदुरबार जिल्ह्यातील पूर्वपट्यात अद्यापही समाधानकारक पाऊस झालेला नाही. विहिरींना जेमतेम पाणी आहे. अशातच विजेचे रोज रात्रीचे भारनियमन गेल्या २ महिन्यापासूनसुरु आहे. अक्राळे सबस्टेशन अंतर्गत आठ दिवसाआड पूर्ण रात्रीचे भारनियमन चालू आहे. रात्री १२.३०ते सकाळी ८.३० वाजेपर्यंत भारनियमन चालु आहे.

शेतीला पाणी मिळत नसल्यानं समाधान पाटील यांच्या शेतातील पिके ही कोमजू लागली. त्यातच वारंवार लाईट ये जा करत असल्याने विद्युत पंप दोन वेळा नादुरुस्त झाला. आई वडील गेल्यानंतर ३ बहिणींचे लग्न याच भावाने केले. त्यामुळे डोक्यावर कर्ज झाले. कर्ज फेडू शकला नाही. सततची नापिकी, भारनियमनामुळे रोजचे जागरण, वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा आदी कारणामुळे नैराश्य आल्याने समाधान पाटील याने घरात आत्महत्या केली. समाधान याच्या मागे ३ बहिणी, पत्नी, १२ वर्षांचा मुलगा व १४ वर्षाची मुलगी आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vice President Election: सी.पी. राधाकृष्णन कोण आहेत? जाणून घ्या राधाकृष्णन यांचा राजकीय प्रवास

Amol Kolhe :...म्हणून लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होतोय; खासदार अमोल कोल्हेंचा भाजपवर जोरदार प्रहार

Jalna Accident: ट्रकच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर; भीषण अपघातात ३ जणांचा जागीच मृत्यू

Voter Fraud : खोपोलीतही मतदार याद्यांमध्ये घोळ, 140 मतदारांची नावं यादीत दोन वेळा

Makeup Side Effects: दररोज मेकअप केल्याने चेहऱ्यावर काय परिणाम होतो?

SCROLL FOR NEXT