ZP Teacher news Saam TV
महाराष्ट्र

ZP Teacher News : शिक्षकांची दिवाळी यंदा उसनवारीवर; पुरेशा निधीअभावी पगार खोळंबला

दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर २१ ऑक्टोबरपर्यंत सर्वच विभागांतील कर्मचाऱ्यांचे वेतन अदा करण्याचा आदेश राज्य शासनाने काढला होता.

दिपक क्षीरसागर

लातूर : राज्य सरकारने दिवाळी (Diwali) सणासाठी २१ ऑक्टोबरपर्यंत सर्वच शासकीय, निमशासकीय कर्मचान्यांना वेतन अदा करण्याचे आदेश दिले होते. मात्र, जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांचे वेतन शनिवार सायंकाळपर्यंत खात्यावर जमा झालेले नाही.

त्यामुळे दिवाळीचा सण सुरू झाला असून, वेतन न झाल्याने प्राथमिक शिक्षकांना (Teachers) उसनवारीवरच सण साजरा करावा लागत आहे. दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर २१ ऑक्टोबरपर्यंत सर्वच विभागांतील कर्मचाऱ्यांचे वेतन अदा करण्याचा आदेश राज्य शासनाने काढला होता.

पाहा व्हिडीओ -

त्यानुसार तातडीने बिलेही जमा करण्यात आली. जिल्हा परिषद माध्यमिक, खासगी शाळांतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्याचे वेतन शुक्रवारीच खात्यावर जमा करण्यात आली आहेत. मात्र, काही जिल्हा परिषद शिक्षकांना शनिवार सायंकाळपर्यंत वेतन मिळालेले नाही.

विशेष म्हणजे, रविवार, सोमवार असे दोन दिवस शासकीय सुटी आहे. त्यामुळे मंगळवारीच वेतन होईल, अशी अपेक्षा शिक्षकांना आहे. दरम्यान, सर्वच जि. प.च्या मुख्याध्यापकांना वेळेत बिले तालुकास्तरावर जमा केली. त्यानुसार जिल्हास्तरावरही पोहोच करण्यात आलेली आहेत.

मात्र, शासनाकडून १२ कोटी ६८ लाख रुपयांचा निधी कमी आलेला आहे. त्यामुळे प्राथमिक शिक्षकांचे वेतन करता येत नसल्याचे समोर येत आहे. शुक्रवारपासून दिवाळीचा उत्सव सुरू झाला आहे. या सणानिमित्त वेतन लवकर हाती पडेल व दिवाळीचा सण धूमधडाक्यात साजरा करण्याचे नियोजन शिक्षकांनी केले होते; मात्र वेतनच न झाल्याने उसनवारीवरच सण करण्याची वेळ शिक्षकांवर आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai-Pune Expressway Missing Link: मुंबई- पुणे कनेक्टिव्हिटी बिघडली; एक्सप्रेसवेवर कोंडी नियोजनचं 'मिसिंग'

LPG Cylinder: महागाईच्या झळा, सामान्यांना 'कळा'! व्यावसायिक सिलेंडर 993 रुपयांनी महागला; खाद्यपदार्थांच्या किंमती वाढणार?

Pune Crime: गुरांच्या गोठ्यात ४ वर्षाच्या मुलीवर बलात्कार, लैंगिक अत्याचारानंतर चिमुरडीची हत्या

Mumbai Pune Missing Link : 'मिसिंग लिंक'ला विरोध; लोणावळ्यातून प्रवेश देण्याची मनसेची मागणी

Ladki Bahin Yojana: राज्यातील १ कोटी ८९ लाख लाडक्या बहिणी पात्र; ५४ लाख बहिणींना नाही मिळणार १५०० रुपये

SCROLL FOR NEXT