Nanded Maratha Andolan saam tv
महाराष्ट्र

Maratha Andolan : मराठा आरक्षणासाठी लिंबगावात रास्ता राेकाे, सर्वच जाती धर्मातील नागरिक उतरले रस्त्यावर

मनोज जरांगे पाटील यांचे बरेवाईट झाल्यास सरकारला सळाे की पळाे करु असा इशारा आंदाेलकांनी दिला आहे.

Siddharth Latkar

- संजय सूर्यवंशी

Nanded News : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी नांदेड जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदाेलन सुरु आहे. आज (मंगळवार) लिंबगाव येथे सरकारच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. यावेळी आंदाेलकांनी रास्ता रोको आंदोलन केले. (Maharashtra News)

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज आक्रमक झाला आहे. बीड, जालना, सोलापूर नंतर आता नांदेड मध्ये देखील मराठा समाज रस्त्यावर उतरला आहे. आक्रमक आंदोलन करून सरकार विरोधात यावेळी घोषणाबाजी करण्यात आलीय. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

यावेळी लिंबगाव येथील सर्वच जाती धर्मातील नागरिकांनी देखील या आंदोलनाला पाठिंबा दिलाय. मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ हे आंदोलन करण्यात आले आहे. मनोज जरांगे यांची तब्बेत खालावली असून त्यांच्या केसालाही धक्का लागला तर संपूर्ण महाराष्ट्र पेटवू असा इशारा मराठा समाजाने दिलाय.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अंबरनाथमध्ये शिवसेना-भाजप युती ठरली? राजकीय सस्पेन्स कायम

Petrol-Diesel Prices : गॅस सिलिंडरनंतर आता पेट्रोल-डिझेल महागले; तुमच्या शहरातील दर काय?

Alcohol Side Effects: मेंदुपासून थेट ह्रदयाला धोका, दारुमुळे शरीरावर होतात हे 7 गंभीर परिणाम

वादळाचा थरार! माणूस थेट हवेत उडाला, धक्कादायक व्हिडीओ व्हायरल

Friday Horoscope: या राशींचे प्रेमसंबंधात अडथळा येण्याची शक्यता; वाचा आजचं राशीभविष्य

SCROLL FOR NEXT