satara saam tv
महाराष्ट्र

Maratha Aarakshan Andolan : आमदार मकरंद पाटलांना काळे झेंडे दाखविणारे आंदाेलक पाेलीसांच्या ताब्यात, साता-यात उपाेषणकर्ते आक्रमक

त्यानंतर आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

ओंकार कदम

Satara News : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमाेर बसलेल्या उपाेषणकर्त्यांच्या प्रकृतीची तपासणी करण्यासाठी वेळेत वैद्यकीय अधिकारी उपलब्ध हाेत नसल्याने आज (साेमवार) मराठा आंदाेलकांनी जिल्हा शल्यचिकित्सक यांच्यावर राेष व्यक्त केला. दरम्यान वाई खंडाळा महाबळेश्वरचे आमदार मकंरद पाटील यांना ग्रामीण भागात आंदाेलकांनी काळे झेंडे दाखवत आरक्षणाची मागणी केली. (Maharashtra News)

वाई विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादीचे आमदार मकरंद पाटील हे मोळी टाकण्याच्या कार्यक्रमासाठी निघाले असताना संतप्त आंदोलकांनी आमदार मकरंद पाटील यांना काळे झेंडे दाखवले. त्यानंतर आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

मांढरदेव येथे राजकीय नेते, पुढाऱ्यांना गावात येण्यास बंदी घालण्यात आली आहे. यामुळे राजकीय नेत्यांना आता मांढरदेवी गडावरील काळुबाईचे दर्शन घेता येणार नाही अशी चिन्हे निर्माण झाली आहेत. दरम्यान मराठा आंदोलकांनी वाई खंडाळा महाबळेश्वर राष्ट्रवादीचे आमदार मकरंद पाटील यांच्या काल झालेल्या वाढदिवसाच्या बँनरला भुईंज येथील भवानी वार्डात काळे फासले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जळगाव महामार्गावर आज पहाटे भीषण अपघात

Ratnagiri : रत्नागिरीत भयंकर घडलं! सकाळी झोपेतून लवकर उठवल्याने सुनेची सटकली, सासूच्या डोक्यात फळी घातली नंतर...

Famous Actress : प्रसिद्ध अभिनेत्रीची व्यवसाय क्षेत्रात एन्ट्री; मुंबईजवळ सुरू केले हॉटेल, VIDEO चर्चेत

High Blood Pressure: रक्तदाब वाढण्यामागे फक्त मीठच नाही, या ६ चुका रोज करत असाल तर हृदयावर वाढतो मोठा ताण

धक्कादायक! कल्याणमध्ये महिलांना जबरदस्तीने वेश्याव्यवसायात ढकलणाऱ्या टोळीच्या आवळल्या मुसक्या; 20 पीडितांची सुटका

SCROLL FOR NEXT