Baglan BJP Dilip Borse vs Deepika Chavan SAAM TV
महाराष्ट्र

SAAM Exit Poll : बागलाणमध्ये आवाज कुणाचा, तुमचा आमदार कोण? पाहा VIDEO

Exit Poll Maharashtra : बागलाण विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व पुढची पाच वर्षे कोण करणार? याबाबत कमालीची उत्सुकता आहे. एक्झिट पोलचा अंदाज काय सांगतो, वाचा सविस्तर...

Nandkumar Joshi

अंबादास देवरे, बागलाण

नाशिकचा ग्रामीण भाग असलेल्या बागलाण विधानसभा मतदारसंघात भाजपचे दिलीप बोरसे आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून दीपिका चव्हाण हे आमनेसामने आहेत. भाजपचे बोरसे यांच्या विजयाचा अंदाज एक्झिट पोलमधून वर्तवण्यात आला आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी २० नोव्हेंबरला मतदान घेण्यात आलं. राज्यात ६० टक्क्यांपेक्षा अधिक मतदान झालं आहे. मतदानानंतर एक्झिट पोल प्रसिद्ध झाले आहेत. अनेक संस्थांच्या एक्झिट पोलमध्ये महायुतीला कौल दिल्याचं दिसून येत आहे. त्याचवेळी सकाळ समूहाच्या साम टीव्हीचे एक्झिट पोलचेही अंदाज आले आहेत.

नाशिकचा ग्रामीण भाग असलेल्या बागलाण मतदारसंघात भाजपचे दिलीप बोरसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून दिपिका चव्हाण रिंगणात होते. या दोघांमध्ये सरळ लढत असल्याचे बोलले जात होते. पण एक्झिट पोलच्या अंदाजानुसार, भाजपचे बोरसे हे संभाव्य आमदार असतील.

स्थानिक समीकरणे काय?

बागलाण मतदारसंघात बोरसे आणि चव्हाण यांच्यात चुरशीची लढत असल्याचे मानले जाते. या मतदारसंघात अंदाजे ६४ टक्के मतदान झाले आहे. भरभरून मतदान झाल्याने निकाल नेमका कुणाच्या बाजूने लागतो, याबाबत मतदारांमध्ये आणि तेथील राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे.

भाजपचे दिलीप बोरसे यांचे पारडे जड मानले जात आहे. त्यांनी केलेली विकासकामे, एकगठ्ठा मते यांच्या जोरावर बोरसे विजयी होऊ शकतात, असा कयास लावला जात आहे. दिपिका चव्हाण या प्रतिस्पर्धी उमेदवार होत्या. मागील निवडणुकीतही या दोघांतच थेट लढत होती. या निवडणुकीत तालुक्यातील १७ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. पण त्यांचा फारसा प्रभाव नसल्याने यावेळी बोरसे निवडून येतील असा एक्झिट पोलचा अंदाज आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT