Bhokardan Assembly SaamTv
महाराष्ट्र

Exit Poll Maharashtra : संतोष दानवे भोकरदन विधानसभेचे आमदार? पाहा Exit Poll

Saam Exit Poll, Bhokardan Assembly : भोकरदन विधानसभा मतदारसंघात संभाव्य आमदार म्हणून संतोष दानवे यांचं नाव समोर येत आहे. भाजप विरुद्ध शरद पवार गट अशी लढत याठिकाणी रंगली आहे.

Saam Tv

भोकरदन विधानसभा मतदारसंघात भाजप उमेदवाराचा बोलबाला दिसत आहे. त्यात संभाव्य आमदार म्हणून संतोष दानवे यांचं नाव समोर येत आहे. या मतदारसंघात भाजप विरुद्ध शरद पवार गट अशी लढत रंगली आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून चंद्रकांत दानवे यांना उमेदवारी मिळाली आहे. त्यामुळे दानवे विरुद्ध दानवे असा सामना याठिकाणी रंगत आहे.

भोकरदन विधानसभा मतदारसंघात भाजपचे संतोष दानवे यांना संभाव्य आमदार म्हणून मतदारांचा कौल असल्याचं सकाळच्या एक्झिट पोलच्या संभाव्य आकडेवारीमधून समोर आलं आहे. ते सध्या या ठिकाणीचे विद्यमान आमदार देखील आहेत.

यावेळी महाराष्ट्रात सर्वाधिक 32 उमेदवार भोकरदन मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यात संतोष दानवे आणि चंद्रकांत दानवे यांच्यात अतिटतीची लढत याठिकाणी झाली. संतोष दानवे हे मागच्या दोन वेळेपासून याठिकाणी आमदार असल्याने त्यांनी केलेली विकासकाम पाहता मतदारांकडून त्यांना पसंती मिळत आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत देखील भोकरदनमध्ये भाजपचे पारडे जड राहील असाच अंदाज आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: खासदार ओमराजे निंबाळकर धाराशिवला जाणार

Operation Tiger : ओमराजे निंबाळकर ठाकरेंच्या शिवसेनेत परतणार? आदित्य ठाकरेंच्या विधानाने राजकीय खळबळ

MUMBAI Local : मुंबईकरांसाठी मोठी बातमी! लोकलवर कोणताही ब्लॉक नाही, ट्रेन रद्द नाहीत, पाहा अपडेट

Maharashtra Weather : मोठी बातमी! पुढील ३ दिवसांत पावसाची शक्यता, हवामान विभागाने दिली महत्त्वाची अपडेट

Pune Fort : सह्याद्रीतील दगडात कोरलेला अद्भुत किल्ला, पुण्यातील ‘हे’ ठिकाण जपतेय इतिहासाचा वारसा

SCROLL FOR NEXT