sadabhau khot 
महाराष्ट्र

दिल्लीहून सदाभाऊंनी शेतक-यांसाठी आणली आनंदाची बातमी

भारत नागणे

पंढरपूर : एफआरपीच्या कायद्यात बदल करणार नसल्याचे आश्वासन केंद्र सरकारने दिल्याचे आज (रविवार) रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी दिले. काेल्हापूरला निघालेल्या सदाभाऊंनी पंढरपूर रेल्वे स्थानकावर माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले एफआरपीच्या कायद्यात बदल करा असा प्रस्ताव राज्य सरकारने पाठवला असला तरी पूर्वीच्या कायद्यात कोणताही बदल केला जाणार नाही. पूर्वी प्रमाणेच १४ दिवसांत एफआरपीची रक्कम शेतक-यांना देणे बंधनकारक राहणार आहे. शेतक-यांनी चिंता करु नये असे आश्वासन केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुश गोयल यांनी दिले आहे असे सदाभाऊंनी नमूद केले. sadabhau-khot-central-government-assures-one-time-frp-solapur-marathi-news-sml80

अलीकडेच राज्य सरकारने एफआरपीच्या कायद्यात बदल करावा असा प्रस्ताव केंद्राकडे पाठवला होता. त्याला रयत क्रांती संघटनेने विरोध करत राज्य सरकारच्या विरोधात आंदोलन केले होते. त्यानंतर खाेत यांनी वाणिज्य मंत्री पियुश गोयल यांची दिल्लीत भेट घेवून एफआरपीच्या कायद्यात बदल करु नये असे विनंती केली होती. यावेळी वाणिज्य मंत्री पियुश गोयल यांनाही एफआरपीच्या कायद्यात कोणताही बदल केला जाणार नाही. पूर्वी प्रमाणेच शेतक-यांना १४ दिवसांत एफआरपीची रक्कम देणे कारखान्यांना बंधनकारक राहणार आहे असे पत्र दिले आहे.

दरम्यान या निर्णयाचे स्वागत रयत क्रांती संघटनेने केले आहे. सदाभाऊ खोत दिल्लीहून कोल्हापूरला जात असताना त्यांचे आज (रविवार) पंढरपुर रेल्वे स्थानकावर शेतक-यांनी स्वागत केले. त्यावेळी रयत क्रांती संघटनेच्या कार्यकर्त्यांना सदाभाऊंना साखर खाऊ घातली. साखर भरवितानाचा क्षणी सर्वाना भरुन आले. यावेळी रयत क्रांती संघटनेचे कार्याध्यक्ष दीपक भोसले यांनी सदाभाऊंचे स्वागत केले.

edited by : siddharth latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: डोंबिवली रेल्वे स्थानकातून राजू पाटील शेकडो मनसैनिकांसह ट्रेनने मुंबईकडे रवाना

मोदी सरकारचं गिफ्ट! ५ टक्के व्याजावर ३ लाखांचं कर्ज; काय आहे सरकारची योजना, कोण घेऊ शकतो लाभ?

Gold Price Today : सोन्याच्या दरात सर्वात मोठा बदल; 18, 22 आणि 24 कॅरेट किती रुपयांनी स्वस्त? आताच घ्या जाणून

'दृश्यम' चित्रपट पाहिला, २००० किमी प्रवास केला अन्…; बापाला संपवल्याचा रचला बनाव, पण एका कॉलने सगळा प्लॅन उधळला

BJP: भाजपला मोठा झटका! दिग्गज महिला नेत्याचा तडकाफडकी राजीनामा; राजकारणात खळबळ

SCROLL FOR NEXT