Nashik News, sadabhau khot  saam tv
महाराष्ट्र

Sadabhau Khot News : सदाभाऊंचा शिंदे - फडणवीस सरकारला इशारा; सत्ता गेल्याने विराेधक पिसाळलेल्या....

मंत्रिपदासाठी नाराज नसल्याचे सदाभाऊ खाेत यांनी स्पष्ट केले.

साम न्यूज नेटवर्क

- तबरेज शेख

Sadabhau Khot News : महाराष्ट्रात कायद्याचे राज्य असताना खंजीर खुपसण्याचा गोष्टी केल्या जाताहेत. त्यामुळे एकमेकांवर चिखलफेक करण्यात धन्यता सुरू आहे. परिणामी शेतक-यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष हाेत आहे. राज्यातील विरोधी पक्ष तर सत्ता हातातून गेल्याने एकदम पिसाळलेल्या कुत्र्यासारखा वागत आहे अशी टीका रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खाेत यांनी नाशिक येथे केली. (sadabhau khot latest marathi news)

रयत क्रांती संघटनेच्या राज्यव्यापी दौऱ्याला नाशिकपासून (nashik) सुरुवात झाली आहे. सदाभाऊंनी आज पत्रकारांशी बाेलताना शेतक-यांकडे दुर्लक्ष हाेऊ नये, त्यांना धीर देणे गरजेचे आहे असे मत व्यक्त केले. ते म्हणाले सुरुवातीला खानदेश आणि विदर्भ येथे दौरा करणार आहाेत असे नमूद केले.

या दौऱ्याचा समारोप पुण्याला (pune) होईल असे खाेत यांनी नमूद केले. ते म्हणाले या दाै-यात पीक परिस्थीतीची पाहणी होईल. अतिवृष्टीने राज्यातील शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्यांना मदत हाेणे गरजेेचे आहे. ऊस उत्पादकला चांगला भाव मिळण्यासाठी जास्तीत जास्त साखर निर्यात होणे गरजेचे आहे असेही खाेत यांनी नमूद केले.

ज्या साखर कारखान्यांनी एफआरपी दिलेला नाही त्यांच्यावर फौजदारी स्वरपाची कारवाई तसेच संचालक मंडळ बरखास्त करण्याची मागणी आम्ही करीत आहाेत असेही खाेत यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले यंदा सर्व साखर कारखान्यांनी एफआरपी देण्याची मागणी केली आहे. (Maharashtra News)

राज्यातील विरोधी पक्ष बेजबाबदारपणे वागत असल्याचे खाेत यांनी म्हटलं. विराेधी पक्ष गर्विष्ठ झाला आहे. विराेधी पक्षातील नेते एकमेंकावर टीका करण्यात धन्यता मानत आहे. हे कायद्याचे राज्य आहे. शेळी नावाची सत्ता हातातून निसटल्याने विरोधी पक्षाला अन्य काेणतेही प्रश्न दिसत नसल्याचे म्हटले. आम्ही जरी सत्तेसोबत असलो तरी शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरू असा इशारा सदाभाऊ खाेत यांनी शिंदे - फडणवीस सरकारला देखील दिला आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heart Attack : डोळ्यांत दिसतात हार्ट अटॅकचे 'हे' ५ संकेत, चुकूनही करू नका दुर्लक्ष

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

MLC Election: मोठी बातमी! विधानपरिषदेसाठी ठाकरेसेनेकडून यादी जाहीर, कुणाला कुठे मिळाली संधी?

High blood pressure: रोजच्या ताटातले हे 6 पदार्थ वाढवतायत तुमचं ब्लड प्रेशर

निवडणूक आयोगाचा भयंकर गोंधळ! पदवीधर मतदार यादीत थेट उद्धव ठाकरेंचे नाव; राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT