Saam TV sting operation exposes gas cylinder black marketing as agents sell LPG cylinders at inflated prices during supply shortage. Saam Tv
महाराष्ट्र

साम टीव्हीचं 'ऑपरेशन सिलिंडर', सगळ्यात मोठ्या रॅकेटचा 'साम'वर भांडाफोड

Gas Cylinder Black Market Sting Operation In India: युद्धामुळे देशात सध्या गॅसची टंचाई आहे. याच टंचाईचा फायदा उचलून गॅसचे एजंट जनतेची सर्रास लूट करत आहेत. याच लुटीचा साम टीव्हीच्या स्टिंग ऑपरेशनमध्ये पर्दाफाश करण्यात आलाय. युद्धाचा फायदा घेत लुटारुंची टोळी कशी सक्रीय झालीय? ही दलालांची टोळी सर्वसामान्यांची कशी लूट करतेय.... पाहूयात साम टीव्हीनं ऑपरेशन सिलेंडरमध्ये केलेलं स्टिंग ऑपरेशन....

Bharat Mohalkar

अमेरिका इराण युद्ध.... आणि त्यात सुरुये भारतीयांची होरपळ.... कारण युद्धाचा पहिलाच फटका बसलाय तो तुमच्या भाकरीला... युद्धामुळे गॅस पुरवठा विस्कळीत झाला आणि इथंच सुरु झाला दलालांचा सुळसुळाट.... याच काळ्याबाजाराची माहिती साम टीव्हीला मिळाली... आणि त्यानंतर साम टीव्ही काळाबाजार सुरु असलेल्या गॅस एजन्सीवर पोहोचली... देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील गॅस सिलिंडरच्या काळाबाजाराचा भांडाफोड केला...

साठेबाजी रोखण्यासाठी सरकारनं एस्मा कायदा लागू केलाय.. नोंदणीनंतर 25 दिवसांनी सिलिंडर देण्याचा नियम केलाय..एवढंच नाही तर भरारी पथकंही नेमलीयेत... मात्र याच नियमांना धुडकावत काळा बाजार करणाऱ्या वितरकांनी नवा फंडा वापरलाय... काळ्याबाजारातील रेट नुसार 8 दिवसात नोंदणी केली तरी सिलेंडर देऊ, असं वितरकाने म्हटलंय..

गॅस सिलिंडरचा काळाबाजार फक्त मुंबईतच नाही तर विठूरायाच्या पंढरपूरातही सुरू झाला.पंढरपुरातल्या कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज चौकातील एच पी गॅस एजन्सीवर काळाबाजार सुरु होता.. त्याची कुणकुण साम टीव्हीला लागली... आणि आम्ही थेट एच पी गॅस एजन्सीवर पोहोचलो... तिथे काय सुरू होतं ते पाहा

मुंबई आणि पंढरपूरनंतर साम टीव्ही पोहोचली ती छत्रपती संभाजीनगरमध्ये.... इथंही गॅस वितरक काळाबाजार करत असल्याचं समोर आलं... 860 रुपयांचा गॅस सिलेंडर दुप्पट दराने विकत असल्याचं साम टीव्हीच्या स्टिंग ऑपरेशनमध्ये उघड झालं... इथं ओटीपीविना सर्रास गॅस सिलिंडर दिला जातोय...

गॅस पुरवठा विस्कळीत झाल्यानं केंद्र सरकारने एस्मा लागू करुन साठेबाजी रोखणार असल्याचं म्हटलंय.. मात्र त्यानंतरही सरकारी नियम धाब्यावर बसवून खुलेआम गॅस सिलिंडरचा काळा बाजार सुरु असल्याचा पर्दाफाश साम टीव्हीने केलाय... त्यामुळे फक्त एस्मा लागू करुन चालणार नाही... तर टंचाईच्या परिस्थितीत काळाबाजार रोखण्यासाठी ठोस पावलं उचलण्याची गरज आहे... नाहीतर परिस्थिती हाताबाहेर जाणार, एवढं मात्र निश्चित...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : पोलिसांवर हल्ला करणाऱ्या आरोपींची भर बाजारपेठेतून काढली धिंड

मुंबईत पुन्हा हिट अँड रन; वाळूने भरलेल्या ट्रकने तिघांना चिरडलं, अपघातानंतर चालक फरार

मोठी बातमी! घरात AC, कार रेशन कार्ड रद्द होणार? 70 लाख रेशनधारकांना फटका बसणार

राज्यपाल हरिभाऊ बागडेंची प्रकृती बिघडली, ICU मध्ये उपचार सुरू; उपमुख्यमंत्र्यांसह मंत्र्यांची हॉस्पिटलमध्ये गर्दी

Palghar Tourism : पालघरमध्ये लपलाय एक ऐतिहासिक किल्ला, ट्रेकर्ससाठी खास आकर्षण आहे 'हे' ठिकाण

SCROLL FOR NEXT