SAAM TV IMPACT: ACTION IN ₹60 CRORE BALUMAMA TEMPLE SCAM, ACCUSED MISSING saam tv
महाराष्ट्र

Saam TV Impact: बाळूमामा देवस्थानातील घोटाळेबाजांवर कारवाई, साम टीव्हीच्या बातमीनंतर कारवाईचा धडाका

₹60 Crore Fraud Exposed: आता बातमी आहे साम टिव्हीच्या इम्पॅक्टची... बाळूमामा देवस्थानातील 60 कोटींचा घोटाळा साम टिव्हीनं समोर आणल्यानंतर आता घोटाळेबाजांवर कारवाई झालीय...मात्र आरोपींनी हा घोटाळा नेमका कसा केला? बाळूमामा देवस्थानातील घोटाळ्या प्रकरणी काय कारवाई झालीय...पाहूयात या रिपोर्टमधून....

Rohit Kadam

कोल्हापूरच्या आदमापूर येथील श्री संत बाळूमामा देवस्थान हे लाखो भाविकांच्या श्रद्धेचं केंद्र आहे. मात्र, याच देवस्थानात तब्बल 60 कोटी 75 लाख 28 हजार 60 रुपयांच्या घोटाळ्याचा पर्दाफाश साम टिव्हीनं केला. त्यानंतर आता कारवाईचा धडाका सुरू झालाय. या घोटाळ्याप्रकरणी दोन जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

घोटाळ्यातील आरोपी कुठे गायब?

यात तत्कालीन धर्मादाय निरीक्षक रागिणी खडके, ट्रस्टचे तत्कालीन सचिव रावसाहेब कोणकेरी यांच्यासह संबंधित विश्वस्त आणि मध्यस्थांचा समावेश आहे. या सर्व अरोपींची बाजू ऐकून घेण्याचा साम टीव्हीनं प्रयत्न केला. मात्र अटकेच्या भीतीमुळे हे सर्व आरोपी गायब असून नॉट रिचेबल असल्याचं पुढं आलंय. त्यामुळे आता या देवस्थानातल्या कोट्यवधींच्या घोटाळ्याचा आर्थिक गुन्हे शाखेकडून सखोल तपास करण्यात येतोय.

बाळूमामा देवस्थानातील घोटाळा काय?

अवघ्या 20 लाखांची जमीन दुरुस्ती दस्ताद्वारे थेट 3 कोटी रुपयांना दाखवून निधी लाटला

देवस्थानाच्या 23 जमिनींची मालकी आणि कागदपत्रांमध्ये मोठे घोळ आढळले आहेत

दानपेटी, पशुधन विक्री व इतर मार्गाने येणाऱ्या कोट्यवधींच्या देणगीचा कोणताही अधिकृत हिशोब नाही

भाविकांनी अर्पण केलेल्या सोन्या-चांदीच्या दागिन्यांचे वजन, नोंद व विक्रीची माहिती गहाळ आहे

उत्पन्न आणि खर्च वेगळा दाखवून आर्थिक फेरफार करण्यासाठी दोन स्वतंत्र नोंदवह्या वापरल्या गेल्या

बनावट कागदपत्रे तयार करणे आणि पुराव्यांमध्ये फेरफार केल्याचं स्पष्ट झालंय.

साम टिव्हीच्या बातमी दखल घेत गुन्हे दाखल होऊन 15 दिवस उलटून गेले तरी या संबंधित व्यक्तींना अटक का झालेली नाही असा सवाल आता भाविकांकडून विचारला जातोय. त्यामुळे नेमक्या कुणाच्या आशीर्वादानं हे आरोपी मोकाट आहेत? कोणत्या बड्या धेंडांनी पोलिसांचे हात बांधलेले आहेत? कोणता बडा मासा यामागे आहे ? या सर्व प्रश्नांची उत्तर एसआयटी शोधणार का? हा खरा प्रश्न आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: राज्यातील नऊ जिल्ह्यात उद्यापासून शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन खत विक्री सुरुवात होणार

Weather Update : पुढील काही तासांत पाऊस धुमाकूळ घालणार, महाराष्ट्रासह १५ राज्यांना अलर्ट; जाणून घ्या हवामानाचा अंदाज

Accident : अचानक सीएनजीचा स्फोट अन्...; २ आमदारांच्या गाडीचा भयानक अपघात, राजकारणात खळबळ

Korean Skincare Tips : कोरियन मुलींसारखा नॅचरल ग्लो हवा आहे? महिनाभर खा 'हे' ६ पदार्थ

Nagpur : नागपुरात मध्यरात्री गॅस गळतीने हाहाकार! ४० जण रुग्णालयात; या भागात जाण्यास बंदी

SCROLL FOR NEXT