karveer vidhan sabha Rahul patil vs Chandradeep Narake saam tv
महाराष्ट्र

Saam Exit Poll : महायुती की महाविकास आघाडी? 'करवीर' कोणाला पावणार? पाहा एक्झिट पोल!

karveer vidhan sabha Rahul patil vs Chandradeep Narake : करवीर विधानसभा मतदारसंघात राहुल पाटील विरुद्ध चंद्रदीप नरके यांच्यात लढत झाली. करवीरचा आमदार कोण होणार हे २३ तारखेला स्पष्ट होईलच, पण त्याआधीच्या एक्झिट पोलमधून राहुल पाटील हे संभाव्य आमदार होऊ शकतात, असा अंदाज आहे.

Nandkumar Joshi

कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर विधानसभा मतदारसंघात शिवसेना विरुद्ध काँग्रेस अशी लढत होती. निवडणुकीसाठी मतदान घेण्यात आलं आहे. काँग्रेसच्या उमेदवाराचं या मतदारसंघात वर्चस्व पाहायला मिळालं. एक्झिट पोलमधून हा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

करवीरचे संभाव्य आमदार हे काँग्रेसचे राहुल पाटील असतील असा अंदाज एक्झिट पोलमधून व्यक्त करण्यात आला आहे. त्यांच्याविरुद्ध शिवसेना शिंदे गटाचे चंद्रदीप नरके यांना उमेदवारी देण्यात आली होती. पण काँग्रेसचे उमेदवार राहुल पाटील हे आमदार होण्याची दाट शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. राहुल पाटील हे विद्यमान आमदार आहेत, तर नरके हे माजी आमदार आहेत. त्यामुळे ही लढत अधिकच रंगतदार झाली होती. (Maharashtra Assembly Election)

करवीरमध्ये माजी आमदार नरके हे महायुतीचे उमेदवार आहेत. तर राहुल पाटील हे त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार होते. जनसुराज्यचे संताजी घोरपडे हे तिसरे उमेदवारही रिंगणात होते. पण या ठिकाणी दुरंगी लढत दिसून आली. करवीरमध्ये कोल्हापूर जिल्हा आणि राज्यातही उच्चांकी मतदान झाले. ८० टक्क्यांपेक्षा अधिक मतदान या ठिकाणी झाले.

महायुतीचे उमेदवार नरके यांनी राज्यातील आणि केंद्रातील योजनांच्या माध्यमातून प्रचारातून राळ उडवून दिली होती. विशेषतः लाडकी बहीण योजना आदींसह प्रसिद्ध योजना घेऊन उमेदवार रिंगणात उतरले होते. येत्या २३ तारखेला हा करवीरचा निकाल समोर येईल.

अगदी काही हजार मतांच्या फरकाने हा निकाल लागू शकतो. आता तो कुणाच्या बाजूने लागणार आहे, ते निकालाच्या दिवशीच स्पष्ट होईल. पण तूर्तास एक्झिट पोलच्या अंदाजानुसार, या ठिकाणी राहुल पाटील हे बाजी मारू शकतात, असे सांगितले जात आहे. एक्झिट पोलमधील अंदाज हा प्राथमिक आहे. निकालाच्या दिवशीच आमदार कोण हे ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raju Shetti : पंढरपुरात शक्तीपीठ महामार्ग विरोधी दिंडी; राजू शेट्टी यांचे आंदोलन, पांडुरंगाला घातले साकडे

Maharashtra Live News Update: बोरिवली पूर्वेतील एसआरए प्रकल्पात भीषण आग

Dhiraj Deshmukh: माजी मुख्यमंत्र्यांच्या धाकट्या मुलाचं शिक्षण किती?

Badlapur : बदलापुरातील भोज धरणातील बंधाऱ्यावर तरुणाचा जीवाशी खेळ | VIDEO

Nagpur Crime: नागरपूरच्या लक्झरी हॉटेलमध्ये देहविक्रीचा नंगानाच, परदेशी तरूणीकडून 'नको ते कृत्य' पोलिसांची रेड अन्..

SCROLL FOR NEXT