Maharashtra Exit Polls Saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Exit Polls : शरद पवार गट की अजित पवार गट, पुसदमध्ये कोणाचा उमेदवार जिंकणार? पाहा एक्झिट पोल

pusad assembly constituency, saam exit poll : यवतमाळ जिल्ह्यातील पुसद विधानसभा मतदारसंघात शरद पवार गट विरुद्ध अजित पवार गट अशी लढाई झाली. या लढाईत अजित पवार गटाचं पारडं जड असल्याचं बोललं जात आहे.

Vishal Gangurde

विधानसभा निवडणुकीचा निकाल उद्या शनिवारी जाहीर होणार आहे. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर दोन्ही गट पहिल्यांदा विधानसभा निवडणुकीसाठी सामारे गेले. यवतमाळ जिल्ह्यातील पुसद विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीच्या दोन्ही गटात लढत पाहायला मिळाली. या लढतीत अजित पवार गटाचं पारडं जड पाहायला मिळालं.

पुसद विधानसभा मतदारसंघात अजित पवार गटाकडून इंद्रनील नाईक रिंगणात होते. तर शरद पवार गटाकडून शरद मैंद रिंगणात होते. या मतदारसंघात दोन सख्ख्या भावांमध्ये निवडणूक होणार होती. मात्र, विद्यमान आमदार इंद्रनील नाईक यांच्या भावाने शेवटच्या क्षणी माघार घेतली. सकाळ समूहाच्या एक्झिट पोलनुसार, इंद्रनील नाईक पुन्हा एकदा जिंकण्याची शक्यता आहे. त्यामुळे इंद्रनील नाईक पुन्हा एकदा त्यांचा गड राखण्यास यशस्वी होणार आहे.

इंद्रनील नाईक हे निवडणुकीत उतरले. या मतदारसंघातील निवडणूक तिहेरी झाली. अजित पवार गट, शरद पवार गट, वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रामुख्याने लढाई होती. परंतु मुख्य चुरस आघाडी विरुद्ध युती अशीच झाली. यंदा बंजारा मते एकवटली. ती मते नाईक यांना मिळाली. तर आदिवासी मते विभागली. मते विभागून वंचित बहुजन आघाडीला गेली. तर ओबीसी आणि भाजपचे मते इंद्रनील नाईक यांना मिळाली. यामुळे नाईक त्यांची विजयाची परंपरा कायम राखतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MPSC students Protest: पुण्यात MPSCआंदोलक विद्यार्थ्यांना पोलिसांची नोटीस

Kidney Health : सकाळच्या या ५ सवयी ठरू शकतात किडनीसाठी घातक?

शेतकरी आणि जमीनधारकांसाठी महत्त्वाची बातमी; ७/१२ पासून ते भू-नकाशांपर्यंत सगळी माहिती एका क्लिकवर

Maharashtra News Live Update: MPSC मुख्य परीक्षा पुनर्तपासणीस मान्यता

राजकारणातील मोठी बातमी! भाजपचा मित्रपक्ष बदलणार आपल्या पार्टीचं नाव; काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT