Maharashtra Exit Polls Saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Exit Polls : कसबा पेठमधून कोण निवडून येणार? रविंद्र धंगेकर की हेमंत रासने? पाहा एक्झिट पोल

Saam exit polls, kasba peth assembly constituency : कसबा पेठ विधानसभा मतदारसंघात रविंद्र धंगेकर यांचं वर्चस्व पाहायला मिळत आहे. या मतदारसंघातील तिहेरी लढतीत धंगेकर निवडून येण्याची शक्यता आहे.

Vishal Gangurde

पुण्यातील कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे. या मतदारसंघात काँग्रेसचे वर्चस्व पाहायला मिळत आहे. सकाळ समूहाच्या एक्झिट पोलनुसार, रविंद्र धंगेकर यांचं मतदारसंघात वर्चस्व पाहायला मिळत आहे. त्यामुळे कसबा पेठचचे रविंद्र धंगेकर संभाव्य आमदार असू शकतात.

कसबा पेठ विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसकडून रविंद्र धंगेकर मैदानात उतरले होते. तर भाजपकडून हेमंत रासने रिंगणात उतरले होते. मनसेनेही या मतदारसंघात उमेदवार दिला होता. त्यामुळे तीन उमेदवारांमध्ये प्रमुख लढत पाहायला मिळाली. एक्झिट पोलनुसार, या लढाईत काँग्रेसचे रविंद्र धंगेकर यांचं वर्चस्व पाहायला मिळत आहे. त्यामुळे भाजपच्या हेमंत रासने यांना पुन्हा एकदा पराभवाला सामोरे जावं लागू शकतं.

कसब्यात काँग्रेसमध्ये अंतर्गत नाराजी होती. तरी काँग्रेसचे धंगेकर येथून निवडून येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कसब्यात धंगेकर यांच्या विजयाची कारणे समजून घेऊयात. कसब्यात काँग्रेस आणि भाजपमध्ये प्रमुख सामना पाहायला मिळाला. या चुरशीच्या लढतीत धंगेकर बाजी मारू शकतात.

मनसेने उमेदवार दिल्याने त्याचा फायदा काँग्रेसला होण्याची शक्यता आहे. धंगेकरांच्या प्रतिमेमुळे त्याचा फायदा त्यांना झाला आहे. लोकसभेची निवडणूक लढवली होती. त्याचाही फायदा झाला. त्यामुळे त्यांच्या विजयाची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

जयशंकर यांचा एक फोन अन् भारताचं गॅसचं टेन्शन मिटलं; इराणने घेतला सर्वात मोठा निर्णय

Maharashtra Live News Update : गॅस सिलिंडरच्या तुटवड्याविरोधात काँग्रेस नेत्यांच आंदोलन

Nashik Crime : नाशिकमध्ये नदीत आढळलेल्या मृतदेहाचं गुढ समोर; पत्नीने भाऊ आणि प्रियकराच्या मदतीने रचला कट

Summer Season Blouse Designs: उन्हाळ्यात डेली वेअरसाठी 'स्लीव्हलेस' की 'एल्बो लेंथ' कोणता ब्लाऊज पॅटर्न निवडावा?

Gold Rate Today: गुड न्यूज! सोनं १०,९०० रुपयांनी झालं स्वस्त, तुमच्या शहरातील २४- २२ कॅरेटचे आजचे दर किती?

SCROLL FOR NEXT