Beed Assembly constituency sandeep kshirsagar vs yogesh kshirsagar saam tv
महाराष्ट्र

Exit Poll Maharashtra : बीडमध्ये शरद पवार की अजित पवार? कोणाचा उमेदवार मारणार बाजी? पाहा VIDEO

SAAM Exit Poll 2024, Beed Vidhan Sabha : बीड विधानसभा मतदारसंघात हायव्होल्टेज लढत असल्याचे मानली जाते. कारण राष्ट्रवादी काँग्रेस फुटल्यानंतर राष्ट्रवादी शरद पवार गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट आमनेसामने आहेत.

Nandkumar Joshi

विनोद जिरे, बीड

महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुकीत बीड मतदारसंघाकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. मतदान घेण्यात आले आहे. आता निकालाकडे लक्ष आहे. शरद पवार गटाकडून संदीप क्षीरसागर आणि अजित पवार गटाकडून योगेश क्षीरसागर हे निवडणूक रिंगणात आहेत.

बीड मतदारसंघात एकीकडे काका शऱद पवार आणि पुतणे अजित पवार यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे, तर दुसरीकडे उमेदवार म्हणून भावाभावांमध्ये चढाओढ लागली आहे. सामच्या एक्झिट पोलनुसार, बीडमध्ये योगेश क्षीरसागर यांचे पारडे जड मानले जात आहे. ते संभाव्य आमदार असू शकतात, असा अंदाज आहे.

योगेश क्षीरसागर हे बाजी मारतील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. एकूणच पाहिलं तर राजकीय वातावरण आहे. समीकरण पाहिलं तर, काट्याची टक्कर असली तरी, योगेश क्षीरसागर यांची बाजू भक्कम आहे. आता हा एक्झिट पोलचा अंदाज आहे. प्रत्यक्ष निकाल २३ तारखेलाच लागेल. तेव्हाच नेमका गुलाल कोण उधळणार हे स्पष्ट होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: 'खुर्च्या तोडण्यासाठी नको तर परिवर्तनासाठी नगरपालिका हवी' देवेंद्र फडणवीसांचा शिंदेसेनेला टोला

White Clothes: अंत्यसंस्कारावेळी पांढरे कपडे का घालतात? कारण वाचून व्हाल आश्चर्यचकीत

डोनाल्ड ट्रम्प यांना बसला टॅरिफचा 'डंक'; सहा देशांकडून F-35 लढाऊ विमानांचा करार रद्द

ऐन निवडणुकीत गोळीबार, कुख्यात गुन्हेगाराची गोळ्या झाडून हत्या, परिसरात खळबळ

Ashish Deshmukh: 'जास्त कराल तर कापून काढू'; आमदार आशिष देशमुखांची विरोधकांना धमकी

SCROLL FOR NEXT