Rupali Chakankar saam tv
महाराष्ट्र

हुंडा देणा-या - घेणा-यांवर महिला आयाेग गुन्हा दाखल करणार : रूपाली चाकणकर

चाकणकर यांनी महिलांवर हाेणारे अत्याचार राेखण्यासाठी कठाेर पावले उचलण्याची गरज असल्याचे नमूद केले.

भारत नागणे

पंढरपूर : समाजातील अनिष्ट रूढी, प्रथा आणि परंपरा या विरोधात महाराष्ट्र (maharashtra) नेहमीच पुढे राहिला आहे. विधवा प्रथा बंद करण्याचा ऐतिहासिक निर्णय देखील महाराष्ट्र सरकारने (maharashtra government) घेतला आहे. यापुढे राज्यात हुंडा (dowry) बंदी‌ कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी केली जाईल. हुंडा घेणा-यापेक्षा देणारा ही तितकाच दोषी आहे. यापुढे लग्नात हुंडा देणारा आणि घेणा-याच्या विरोधात महिला आयोग स्वतः पुढे येवून अशा लोकांच्या विरोधात गुन्हे दाखल करेल असा इशारा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर (rupali chakankar) यांनी येथे दिला. (rupali chakankar latest marathi news)

पंढरपूर (pandharpur) तालुक्यातील भाळवणी येथे महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या (ncp) तालुका अध्यक्ष राजेश्री ताड यांनी महिला व युवक मेळाव्याचे आयोजन‌ केले होते. त्यावेळी चाकणकर यांनी भाषणात महिला आणि मुलींवर होणारे अत्याचार सहन केले जाणार नाहीत असे नमूद केले.

चाकणकर म्हणाल्या मुलगी ही स्वत:च्या पायावर सक्षमपणे उभी राहिलि पाहिजे. मुलाला जेवढा शिक्षणासाठी खर्च केला‌ जातो तेवढाच खर्च मुलीच्या शिक्षणासाठी केला जातो. तरी मुलीच्या लग्नाच्यावेळी तिचा बाजार मांडला जातो. ही प्रथा बंद झाली‌ पाहिजे. यासाठी लोकांनी पुढे आलं पाहिजे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: राज्यात उष्णतेचा कहर, विदर्भात तापमान ४५ पेक्षा जास्त

IPL 2026 मधील सर्वात जबरदस्त सामना; अवघ्या ३९ चेंडूंत RCBने मिळवला विजय,पॉईंट्स टेबल बेंगरुळुची भरारी

Vande Bharat Train Accident : मुंबईहून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा अपघात कसा घडला? कारण आलं समोर

Gold and Silver Prices: चांदी चकाकली! चांदीच्या दरात ३,५०० रुपयांची वाढ, सोनंही महागलं

LPG Cylinder Booking Rules: १ मे पासून एलपीजी बुकिंगचे नियम बदलणार, सिलिंडर डिलीव्हरीतही बदल होणार?

SCROLL FOR NEXT