Rupali Chakankar on Navneet Rana Saam Tv
महाराष्ट्र

...तर खासदार नवनीत राणा यांनी राज्य महिला आयोगाकडे तक्रार द्यावी : रूपाली चाकणकर

Rupali Chakankar on Navneet Rana : रुपाली चाकणकर यांनी पंढरपूरमध्ये पत्रकार परिषद घेत राणा दांपत्यावर निशाणा साधला.

भारत नागने

पंढरपूर : खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांना पोलीस, राज्य सरकारकडून जो काही त्रास झाला असेल, तर त्यांनी राज्य महिला आयोगाकडे तशी तक्रार द्यावी. त्यामध्ये तथ्य असेल तर निश्चित त्याची दखल घेऊ, असे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी आज सांगितले. रुपाली चाकणकर आज पंढरपूर (Pandharpur ) दोऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी चाकणकर बोलत होत्या. ( Rupali Chakankar on Navneet Rana )

हे देखील पाहा -

रुपाली चाकणकर यांनी पंढरपूरमध्ये पत्रकार परिषद घेत राणा दांपत्यावर निशाणा साधला. खासदार राणा यांना पोलीस, राज्य सरकारकडून त्रास झाला असेल, तर त्यांनी रितसर राज्य महिला आयोगाकडे तशी तक्रार द्यावी. आम्ही त्या तक्रारीची दखल घेऊ, असे सांगत त्यांनी नवनीत राणा यांच्यावर निशाणा साधला. पुढे चाकणकर म्हणाल्या, 'कोरोनानंतर आता कुठे महाराष्ट्र सावरत आहे. त्यात महाराष्ट्र राज्यापुढे महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न असे अनेक मुद्दे आहेत. भोंगा,हनुमान चालीसा लावणे हे प्रश्न सर्वसामान्य लोकांसाठी महत्वाचे नाहीत. तुम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानाच्या आवारात बसून कायदा सुव्यवस्थाच धोक्यात आणायचा प्रयत्न करता, अशा शब्दात रुपाली चाकणकर यांनी नवनीत राणांवर टीका केली.

पुढे चाकणकर म्हणाल्या, 'महाराष्ट्र राज्य सध्या शांत आहे. मात्र, काही लोकांना महाराष्ट्र अशांत करायचा आहे. राज्य अशांत करणारे लोक हे विकृत मनोवृत्तीचे आहे', असा घाणाघाती आरोप राणा दांपत्य व चितळे प्रकरणावरून राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी केला आहे. खासदार नवनीत राणा यांनी मुख्यमंत्र्याच्या घरासमोर हनुमान चालीसा पठण करण्याच्या प्रयत्नावरून मुंबईत चांगलाच गदारोळ झाला होता. यामुळं राणा दांपत्यांना जेलवारी करायला लागली होती. त्यानंतर राणा दांपत्य आणि शिवसेना नेते संजय राऊत लेह-लडाख दौऱ्यावर होते. दरम्यान, रूपाली चाकणकर यांच्या घणाघाती आरोपानंतर खासदार नवनीत राणा काय प्रत्युत्तर देणार, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

Edited By - Vishal Gangurde

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

देवेंद्र फडणवीस पंतप्रधान व्हावेत! राज्यातील बड्या नेत्याची इच्छा; राजकीय चर्चांना उधाण

बदल्यांचा धडाका सुरूच! 31 IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; पोलिस दलात मोठी खळबळ

Maharashtra News Live Update: राहुल गांधी मांजरीत विद्यार्थ्यांच्या भेटीला येणार

Shocking: गेस्ट हाऊसच्या खोलीत ५ जणांचा संशयास्पद मृत्यू, एकाच कुटुंबातील सदस्यांसोबत नेमकं काय घडलं?

UP Accident News : महामार्गावर भीषण अपघात; डंपरमध्ये अडकून ५० मीटर फरफटत गेली कार, आई-वडिलांसह दोन मुलांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT